VIDEO : 'कुत्ते की तरह मारूंगी', BJP उमेदवाराची TMC कार्यकर्त्यांना धमकी

VIDEO : 'कुत्ते की तरह मारूंगी', BJP उमेदवाराची TMC कार्यकर्त्यांना धमकी

पश्चिम बंगालमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजप उमेदवार भारती घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धडा शिकवण्याची धमकी दिली.

  • Share this:

कोलकाता, 5 मे : पश्चिम बंगालमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजप उमेदवार भारती घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली. जास्त शहाणपणा करण्याचा प्रयत्न केल्यास उत्तर प्रदेशातील लोकांना बोलावून तुम्हाला (TMC कार्यकर्ते) चांगलाच धडा शिकवेन, असे विधान घोष यांनी शनिवारी केलं. एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अगदी जवळची व्यक्ती मानल्या जाणाऱ्या भारती घोष यांनी प्रचारसभेदरम्यान हे विधान केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी घोष यांना सीमा न ओलांडण्याचा इशारा यापूर्वीच दिला होता. पण त्यांनी  हा इशारा गांभीर्यानं न घेतल्याचं पाहायला मिळालं.

वाचा :VIDEO : 'जय श्रीराम'च्या घोषणांनी भडकल्या ममतादीदी; म्हणाल्या, 'निकालानंतर इथंच राहायचं आहे ना!'

भारती घोष नेमकं काय म्हणाल्या ?

प्रचारसभेदरम्यान भारती घोष यांनी टीएमसी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं की, 'आपापल्या घरी जा आणि येथे जास्त शहाणपणा दाखवण्याचा प्रयत्न करू नका. लपण्यासाठी कोणतीही जागा मिळणार नाही. मी तुम्हाला तुमच्याच घरातून बाहेर काढेन आणि कुत्र्यासारखं मारेन. उत्तर प्रदेशातून हजारो लोकांना बोलावून तुम्हाला चांगलाच धडा शिकवेन.'

वाचा :SPECIAL REPORT : केजरीवाल ते हार्दिक पटेल, का होतात विरोधकांवर अपमानास्पद हल्ले?

दरम्यान, घोष यांच्याविरोधात टीएमसीनं निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याची माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांनी दिली आहे. यावर निवडणूक आयोगानं जिल्हा प्रशासनाकडे अहवाल मागितल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना घडण्यापूर्वीच ममता बॅनर्जींनी घोष यांना सीमा न ओलांडण्याची चेतावणी दिली होती. दिलेला सल्ला न ऐकल्यास त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता.

वाचा : जम्मू काश्मीरमध्ये भाजप नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी जवळून मारल्या 5 गोळ्या

घोष यांच्यावर यापूर्वीही पोलीस कर्मचारी तसंच विरोधी पक्षातील नेत्यांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, 4 फेब्रुवारी रोजी भारती घोष यांनी भाजपप्रवेश केला. भाजपकडून त्यांना घटल लोकसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं आहे.

SPECIAL REPORT : तरुणीची दादागिरी, बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत नगरसेवकाकडून खंडणी

First published: May 5, 2019, 7:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading