मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनानंतर राजकीय चित्र बदलणार? 2022 विधानसभा निवडणुकीत राजकीय नेते नाही तर आधुनिक होणार प्रचार

कोरोनानंतर राजकीय चित्र बदलणार? 2022 विधानसभा निवडणुकीत राजकीय नेते नाही तर आधुनिक होणार प्रचार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोना महासाथीनंतर सर्वच क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. शाळांची जागा ऑनलाइन क्लासेसने घेतली, कार्यालयांची जागा WFH ने घेतली आता निवडणुकांचा काय?

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 20 जून : कोरोना वायरस महासाथीतील दुसरी लाट ओसरत असताना देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. मात्र असं असलं तरी सार्वजनिक जागांवर सभांना घेण्यास बंदी आहे. अशात 2022 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांनी जर ह्यूमनॉइड रोबोटचा वापर निवडणुकांच्या प्रचारासाठी केला तर आश्चर्य वाटणार नाही. वनस्टँड इंडिया प्राइवेट लिमिटेड कंपनीने या हेतूने ‘DOOT’ नामक एक ह्यूमनॉइड रोबोटची निर्मिती केली आहे. जो रोबोट विविध आवाज आणि चेहरे ओळखू शकेल आणि ज्याची हावभाव समजण्याची क्षमता आहे.

6 राज्यांमध्ये कॅम्पेन करताना दिसू शकतात रोबोट

पुढील वर्षी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी या रोबोटचा वापर केला जाऊ शकतो. कंपनीनुसार पुढील वर्षी अनेक राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये या रोबोटचा वापर करण्याबाबत राजकीय पक्षांशी चर्चा सुरू आहे. 2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या वर्षी एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुकीत एक नवगठण झालेला राजकीय पक्ष इंडिया मक्कल मुनेत्र काची (आयएमएमके) ने पहिल्यांदा निवडणूक प्रचारासाठी रोबोटचा वापर केला होता. 'दूजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या 4 फूट रोबोटला पक्षाचा सिंबलदेखील म्हटलं जात आहे. आता ‘दूत’ महासाथीदरम्यान आपल्या संदेशांसह एका ठराविक समुहापर्यंत पोहोचून राजकीय पक्षांची सेवा करण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा-'कोणत्याही बदलाला विरोध'; काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीआधीच पाकिस्तान चिंतेत

काय आहे रोबोटचे फिचर्स

वनस्टेंड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक कुमार कन्हैया सिंह यांनी सांगितलं की, “रोबोट ‘दूत’च्या रोव्हरमध्ये मोठी व्हीलबेस असून त्यामध्ये ऑल-व्हील-ड्राईव्ह गीयरबॉक्स आहे. जो खडबडीत पृष्ठभागांवरसुद्धा सहजतेने फिरण्यास सक्षम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) सक्षम आवाज ओळखीच्या माध्यमातून ह्यूमनॉइड रोबोट 'दूत' राजकारण्यांच्या वतीने जनतेला संबोधित करतील. याशिवाय कंपनीच्या टीमकडून वेळोवेळी प्रश्न आणि परस्परसंवादाची समीक्षा केली जाईल. ज्यांच्याकडे प्रत्येक समीक्षेनंतर अपडेट केलेल्या सामान्य प्रश्नांची उत्तरे असतील.

‘दूत’ एक कस्टम-निर्मित सर्वो मोटरनी युक्त आहे. यामुळे तो खाली वाकू शकतो व एखादी वस्तू उचलूही शकतो. ह्यूमनॉइड रोबोट ‘दूत’ 140 डिग्रीपर्यंत एकट्याने वळूही शकतो. त्यामुळे असा करणारा हा देशातील एकमात्र ह्यूमनॉइड ठरला आहे. या रोबोटच्या डोक्यावर एचडी कॅमरे लावण्यात आले आहे. याच्या माध्यमातून ऑपरेटर व्यवस्थित समोरील दृश्य पाहू शकतो व रेकॉर्डही करू शकतो. सिंह पुढे म्हणाले की, हा रोबोट आवाज करीत नाही आणि ब्रेकडाउन तर होत नाहीच. महासाथीमुळे राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांनासुद्धा भेटू शकत नाहीत. हे रोबोट कॅम्पेनर्सच्या वेळेची बचत करतील. कारण एकाच वेळी बर्‍याच ठिकाणी अनेक ह्मुमनॉइड जाऊ शकतात.

First published:

Tags: Corona spread, Election