Home /News /national /

Cyclone Yass ने वाढवली शेतकऱ्यांची चिंता, चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर?

Cyclone Yass ने वाढवली शेतकऱ्यांची चिंता, चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर?

Cyclone Yass: सध्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळाचं (Yaas Cyclone) संकट घोंघावत आहे. पुढील काही तासांत हे चक्रीवादळ ओडिशा (Odisha) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) किनारपट्टीवर येऊन धडकणार आहे.

    मुंबई, 25 मे: मागील आठवड्यात देशाच्या पश्चिम किनारपट्टीला तौत्के चक्रीवादळानं (Tauktae Cyclone) जोरदार तडाखा दिला आहे. यानंतर आता देशाच्या पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळाचं (Yaas Cyclone) संकट घोंघावत आहे. पुढील काही तासांत हे चक्रीवादळ ओडिशा (Odisha) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) किनारपट्टीवर येऊन धडकणार आहे. सध्या हे चक्रीवादळ ताशी 17 किमी वेगानं किनारपट्टीकडे मार्गक्रमण करत आहे. या वादळाची तीव्रता लक्षात घेता, प्रशासनानं हजारो नागरिकांचं स्थलांतर केलं आहे. असं असलं तरी उर्वरित देशातील शेतकऱ्यांना एक वेगळीचं चिंता सतावू लागली आहे. मार्गात येणाऱ्या सर्व गोष्टींना आपल्या कवेत घेऊन पुढे सरसावणाऱ्या यास चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवरही होईल का? अशी भीती देशातील शेतकऱ्यांना सतावत आहे. गेल्या आठवड्यात 21 मे रोजी बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचं आगमन झालं आहे. तर 1 जूनला केरळात मान्सून आगमन होण्याची शक्यता आहे. पण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या वादळांमुळे यंदा मान्सून लांबण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळांमुळे मान्सून पोहोचण्यास विलंब झाल्यास शेती आणि शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरात विविध ठिकाणी खरिप हंगामाच्या कामांना सुरुवात झाली आहे. पण मान्सूनच्या आगमनाला विलंब झाल्यास पेरणी लांबू शकते. परिणामी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अशात या चक्रीवादळामुळे शेतकरी आणखी चिंताग्रस्त होताना दिसत आहेत. हे वाचा-पावसाळ्यापूर्वी लहान मुलांना 'ही' लस देणं आवश्यक, Covid टास्क फोर्सचा सल्ला भारत हा देश कृषीप्रधान देश असला तर अजूनही देशात 40 टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मान्सून वेळेत दाखल नाही झाला, तर याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. त्याचबरोबर शेतीतील उत्पादनावरही याचा परिणाम होऊ शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyclone, Weather forecast, Weather update

    पुढील बातम्या