विमानाने प्रवास करणार असाल तर सावधान, नाहीतर होऊ शकते कारवाई!

विमानाने प्रवास करणार असाल तर सावधान, नाहीतर होऊ शकते कारवाई!

त्यामुळे त्या नियमांचं उल्लंघन करू नका आणि प्रवाशांनाही करू देऊ नका असं DGCAने सर्व विमान कंपन्यांना बजावलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 12 सप्टेंबर: कोरोना संकटामुळे प्रवासावर निर्बंध आले आहेत. मर्यादीत स्वरूपात जी वाहतूक आहे त्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. अभिनेत्री कंगना रणौत जेव्हा चंदिगडवरून मुंबईला आली त्यावेळी विमानात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी नियमांचं उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे. त्याचे व्हिडीओ बाहेर आल्यानंतर Director General of Civil Aviation म्हणजेच DGCAने सर्व विमान कंपन्यांना पत्र पाठवून इशारा दिला आहे. या पुढे असं उल्लंघन झालं तर 7 दिवसांसाठी वाहतूक बंद करू असं सांगितलं आहे.

विमान कंपन्यांनी कोविड नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर तात्काळ कारवाई करावी अशी सूचनाही DGCAने केली आहे. कंगनाने 9 सप्टेंबरला इंडिगोच्या 6E264  या फ्लाईटने चंदिगडहून मुंबईला प्रवास केला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केले नव्हते. त्यामुळे DGCAने नव्याने पत्र पाठवलं आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा प्रवासासाठी कडक नियम केले आहेत.

त्यामुळे त्या नियमांचं उल्लंघन करू नका आणि प्रवाशांनाही करू देऊ नका असं DGCAने सर्व विमान कंपन्यांना बजावलं आहे.

बिहारमधून फडणवीसांनी साधला CM उद्धव ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विकेण्डला धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 24 तासांत देशात तब्बल 97 हजार 570 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. ब्राझिलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर पोहोचली आहे.

देशात 9 लाख 58 हजार 316 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंतचा देशातील आकडा 46 लाखावर पोहोचला आहे. कोरोनाममुळे गेल्या 24 तासांत 1 हजार 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 77,472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 36 लाख 24 हजार 197 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेले 5 तरुण चीनने भारताकडे सोपवले!

मे महिन्याच्या सुरुवातीला 64 लाख (64,68,388) लोक कोरोना विषाणूच्या धोक्यामध्ये होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास 95 हजार दररोज नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 12, 2020, 7:07 PM IST

ताज्या बातम्या