• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ममता बॅनर्जींवर झालेल्या कथित हल्ल्याची CBI चौकशी? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

ममता बॅनर्जींवर झालेल्या कथित हल्ल्याची CBI चौकशी? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचं (Alleged Attack on Mamata Banerjee) प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिक दाखल करण्यात आली असून CBI तपासाची मागणी करण्यात आली आहे.

 • Share this:
  कोलकाता 09 एप्रिल: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचं (Alleged Attack on Mamata Banerjee) प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिक दाखल करण्यात आली असून CBI तपासाची मागणी करण्यात आली आहे. यावर मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तीन वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत 10 मार्च 2021 रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झालेल्या नंदीग्राममधील घटनेच्या सीबीआय तपासाची मागणी केली आहे. या घटनेवरुन मोठं राजकारण तापलं होतं. या घटनेत पायाला जखम झालेल्या ममता बॅनर्जी पायाला प्लास्टर असतानाही निवडणूक प्रचार करत आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण - ममता बॅनर्जी यांनी 10 मार्च 2021 ला नंदीग्राम विधानसभेसाठी आपलं नाव नोंदवलं होतं. याच दिवशी संध्याकाळी त्या एका ठिकाणी गेल्या होत्या. या दरम्यान काही लोकांनी त्यांना घेरलं आणि त्यांच्यावर हल्ला केला, असा ममता यांचा आरोप आहे. या घटनेत ममता यांच्या पायाला दुखापत झाली आहे. सोबतच त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. याबद्दल बोलताना प्रत्यक्षदर्शी असलेल्या निमाई मैती यांनी सांगितलं, की घटना माझ्या दुकानासमोरच घडली. जवळपास 6: 10 ते 6: 20 च्या दरम्यान ममता बॅनर्जी एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात जात होत्या. याच ठिकाणी एक वळण आहे. ममता आपल्या गाडीतून हात करत होत्या आणि त्या गाडीतून थोड्या बाहेर निघाल्या होत्या. तितक्यात लोक धावू लागले आणि गाडीचा दरवाजा त्यांच्या पायावर आला. मात्र, ममता यांचा असा आरोप होता, की त्यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला आहे. त्यांना कारमध्ये धक्का देण्यात आला आणि यानंतर जबरदस्ती दरवाजा लावण्यात आला. या कथित हल्ल्यानंतर ममता अनेक दिवस रुग्णालयात दाखल होत्या. जेव्हा त्या रुग्णालयातून बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्या पायाला प्लास्टर होतं. सध्या याच अवस्थेत ममता बॅनर्जी निवडणूक प्रचार करत आहेत. या घटनेबाबत वेगवेगळ्या रिपोर्टच्या आधारे निवडणूक आयोगानं असं म्हटलं होतं, की ममता यांच्यावर कोणताही हल्ला झाला नसून ही केवळ एक दुर्घटना होती.
  Published by:Kiran Pharate
  First published: