भारताचा माजी कर्णधार भाजपमध्ये प्रवेश करणार? अमित शहा म्हणाले...

भारताचा माजी कर्णधार भाजपमध्ये प्रवेश करणार? अमित शहा म्हणाले...

अमित शहा म्हणाले, अशा प्रकारची चर्चा खरी झाली तर चांगलच ठरेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट संघा(Team India) चा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly)यांची बीसीसीआय(BJP)च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक अशी गांगुलीची ओळख आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होण्याआधीपासून गांगुलीच्या नावाची चर्चा होती. आता पुन्हा एकदा गांगुलीचे नाव चर्चेत आले आहे. अर्थात यावेळी चर्चेत येण्याचे कारण क्रिकेट नव्हे तर राजकारण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यामागे भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अर्थात शहा यांनी या वृत्ताचे खंडण केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बीसीसीआयचा अध्यक्ष कोण होणार हे मी ठरवत नाही.

दरम्यान, गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. नेमका हाच प्रश्न शहा यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर अमित शहा म्हणाले, सौरव गांगुली आणि माझी भेट झाली होती. त्याच चुकीचे असे काहीच नाही. मी अनेक वर्षांपासून क्रिकेटशी संबंधित आहे. त्यामुळे गांगुली आणि माझ्या भेटीत चुकीचे असे काहीच नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांगुली आणि शहा यांच्या भेटीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुलीच्या नावावर एकमत झाल्याची चर्चा आहे. याबदल्यात पश्चिम बंगालमध्ये 2021मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपकडून गांगुली निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

शहा यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी अशा प्रकारची कोणतीही डील झाली नसल्याचे ते म्हणाले. गांगुली यांनी भाजपमध्ये यावे यासाठी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा चुकीच्या असल्याचे ते म्हणाले. मी या देशातील प्रत्येक नागरिकाला हेच सांगत असो की भाजप एक चांगला पक्ष आहे आणि देशातील प्रत्येक नागरिकाने पक्षात प्रवेश केला पाहिजे. हे माझे काम आहे. पण गांगुली यांच्या संदर्भात जी चर्चा सुरु आहे ती खरी नाही. अर्थात हे सांगितल्यानंतर शहा यांनी अशा प्रकारची चर्चा खरी झाली तर चांगलच ठरेल.

गांगुलीच्या राजकीय प्रवेशाबद्दल अनेक वेळा चर्चा झाली आहे. खुद्द भाजपने 2016च्या विधानसभेच्या आधी गांगुलीला निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. इतक नव्हे तर भाजपने गांगुलीला हव्या द्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले होते. भाजप बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या विरुद्ध एका चेहऱ्याच्या शोधात आहे. ममतांच्या विरुद्ध लढण्यासाठी गांगुली सर्वात योग्य असल्याचे मानले जात आहे. अर्थात अमित शहा यांच्या मते पक्षाला बंगालमध्ये कोणत्याही चेहऱ्याची गरज नाही. चेहरा नसताना लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा जिंकल्याचे ते म्हणाले.

VIDEO : 'बाळ, तुझा पैलवान तयार आहे का?' शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं ओपन चॅलेंज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 11:05 AM IST

ताज्या बातम्या