S M L

रस्ते नीट दिसले नाहीत तर काॅंट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन - गडकरी

जर रस्त्यांची परिस्थिती वाईट असेल तर मी काॅंट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

Updated On: Dec 7, 2018 10:40 AM IST

रस्ते नीट दिसले नाहीत तर काॅंट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन - गडकरी

मुंबई, 07 डिसेंबर : आम्ही हाती घेतलेल्या रस्त्यांच्या कामात कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. जर रस्त्यांची परिस्थिती वाईट असेल तर मी काॅंट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

तर "आम्ही आतापर्यंत किमान 10 लाख कोटींची वर्क ऑर्डर दिली आहे आणि हे सांगताना मला गर्व आहे की, आतापर्यंत कामाची ऑर्डर घेण्यासाठी एकाही काॅंट्रॅक्टरला दिल्ली ऑफिसमध्ये येण्याची गरज भासली नाही. हे मी अभिमानाने सांगू शकतो. पण एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक काॅंट्रॅक्टरला खडसावून सांगलं आहे की, जर रस्त्याची कामं नीट झाली नाही तर तोच बुलडोजर तुमच्यावर फिरवेन. हे बोलण्यासाठी मला काहीही संकोच नाही आहे."

प्रसिद्ध लेखक तुहिन सिन्हा यांच्या ‘India Inspires’ या पुस्तक प्रकाशानावेळी ते बोलत होते. हे पुस्तक नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध करण्यात आलं आहे.


ते पुढे म्हणाले की, आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे फक्त रोड नाही तर जलमार्गालादेखील जोडण्यात येणार आहे. विमानतळावर जलमार्गाने प्रवास केल्यानंतर लोक फक्त 20 मिनिटांत विमानतळावर पोहचू शकणार आहेत. पण यावर पर्यावरणतज्ज्ञांनी अथडळे निर्माण केले आहेत आणि याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. पण मी मुंबईत मंत्री असताना, अनेक प्रकल्पाच्या विरोधात कोर्टात 100 पेक्षा जास्त याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थित पर्यावरणाशी तडजोड करणार नसल्याचंही गडकरी म्हणाले.

या प्रकल्पातून पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही यासाठी आम्ही सर्वोत्तम उपाय करणार असल्याचंही नितीन गडकरी म्हणाले पण दाखल झालेल्या याचिकेमुळे कामाला विलंब होत असल्याचंही ते म्हणाले.


Loading...

VIDEO: 'साताऱ्यात फक्त मीच चालतो'च्या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची गाडी फोडली


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 10:16 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close