• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • आता अंतराळातून शत्रूंवर नजर ठेवणार; ISROकडून ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइटचं यशस्वी प्रक्षेपण

आता अंतराळातून शत्रूंवर नजर ठेवणार; ISROकडून ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइटचं यशस्वी प्रक्षेपण

एओएस-०1 या उपग्रहाचा वापर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

 • Share this:
  बंगळुरु, 7 नोव्हेंबर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) जगात पुन्हा एकदा आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन नवा इतिहास रचणार आहे. आज 7 नोव्हेंबर रोजी इस्रोकडून सॅटेलाइटचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी इस्रोने एओएस-०1 म्हणजेच अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइटचं प्रक्षेपण केलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे प्रक्षेपण 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजू 2 मिनिटांनी करण्यात येणार होते. मात्र श्रीहरिकोटा येथे पाऊस सुरू असल्यानं प्रक्षेपण लांबलं आहे. एओएस-०1 (EOS-01) या उपग्रहाचा वापर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याच्या सिंथेटिक अपर्चर रडारच्या माध्यमातून दिवसा व रात्रीच्या वेळी शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवता येणार आहे. हा उपग्रह ढगांचे अडथळे असतानाही त्याला भेदून चांगल्या प्रतीचा फोटो घेण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे लष्कराला याची मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. पावसामुळे प्रक्षेपण 10 मिनिटे उशिरा होणार असल्याचे सांगितले जात आहे. काही मिनिटांपूर्वीच यशस्वीपणे हे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. सध्या भारत आणि चीनमध्ये तणाव सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तानातून सुरू असलेली घुसखोरी अद्याप थांबलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर या सॅटेलाइटचा चांगला उपयोग होणार आहे. याशिवाय कृषी, भूविज्ञान. समुद्र किनाऱ्या याबरोबरच अन्य क्षेत्रातही सुरक्षा मजबूत करण्यासाठी या सॅटेलाइटचा उपयोग होईल.
  Published by:Meenal Gangurde
  First published: