Home /News /national /

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर राष्ट्रवादीची भाजपसोबत युती? शरद पवारांनी दिलं 'हे' उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर राष्ट्रवादीची भाजपसोबत युती? शरद पवारांनी दिलं 'हे' उत्तर

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली.

    नवी दिल्ली, 6 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. जवळपास 20 ते 25 मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील राजकारणात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत युती करणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला. मोदींसोबत झालेल्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. राष्ट्रवादी आणि भाजपची युती होणार? नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या शरद पवार यांची भेट झाल्यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, शिवसेनेसोबत आमची जेवढी कटूता आहे तेवढी कटूता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नाहीये. यावर शरद पवार म्हणाले, कुणी काय सांगितले मला माहिती नाही. दुसऱ्यांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपसोबत जाणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिन्ही पक्ष मिळून भाजपच्या विरोधात पावलं उचलत आहेत आणि उचलणार. महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही. महाविकास आघाडी सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आणि त्यानंतर पुन्हा सत्तेत येणार असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. भेटीत काय झाली चर्चा ? महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती अद्यापही प्रलिबित आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. दुसरा मुद्दा असा की, राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडला. 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्दयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार करुन योग्य तो निर्णय घेतील असंही शरद पवार म्हणाले आहेत. नवाब मलिकांवरील कारवाईवर कुठलीही चर्चा झाली नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची काय गरज होती? त्या कारवाई मागचं नेमकं कारण काय? असा प्रश्नही शरद पवारांनी उपस्थित केला आहे. नरेंद्र मोदी - शरद पवार भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'मी सकाळी 7 वाजता निघालो, त्यानंतर शिर्डीला आलो, त्यानंतर कोपरगावला आलो. मुंबईला गेल्यानंतर मला अधिक माहिती मिळणार आहे. पण पाठीमागच्या काळामध्ये पवारसाहेबांनी भेट घेतली होती. निवडून आलेल्या आमदारांनी रितसरपणे राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी सोपवली आहे. पण वर्ष झाले तरी काही निर्णय झाला नाही. उलट असं सांगण्यात आले की, आमच्या वरिष्ठांशी बोला. त्यामुळे शरद पवार हे आज दिल्लीत आहे, त्यांनी हा विषय त्यांच्या कानी टाकला असू शकतो, असं अजित पवार यांनी सांगितलं.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Narendra modi, NCP, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या