जीएसटीचा लग्नाच्या खर्चावर काय परिणाम होईल?

जीएसटी लागू झाल्यावर जर तुम्ही लग्न करत असाल तर तुमचा खर्च वाढेल की कमी होईल? कुठल्या वस्तूंवर केलेला खर्च वाढेल कुठल्या वस्तूंवरचा कमी होईल. चला याचाच एक आढावा घेऊया...

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2017 06:08 PM IST

जीएसटीचा लग्नाच्या खर्चावर काय परिणाम होईल?

26 जून : 1 जुलैपासून देशभरात एकच करप्रणाली म्हणजे जीएसटी लागू होणार आहे. आता जीएसटी लागू झाल्यावर जर तुम्ही लग्न करत असाल तर तुमचा खर्च वाढेल की कमी होईल? कुठल्या वस्तूंवर केलेला खर्च वाढेल कुठल्या वस्तूंवरचा कमी होईल. चला याचाच एक आढावा घेऊया...

दागिने खरेदी

लग्न म्हटलं की, सगळ्यात महत्वाचे असतात दागिने.

त्यात ही भारतीय लग्नांमध्ये सगळ्यात जास्त खरेदी होते ती सोन्याची. आता जीएसटी लागू झाल्यावर सोन्यावर फक्त 3 टक्के कर आणि सोन्याच्या मेकिंगवर 5 टक्के कर लागणार आहे. आतापर्यंत सोन्यावर 6 टक्के कर होता. आता सोनं थोडं स्वस्त होणार आहे. त्यामुळे ज्वेलरीवरचा तुमचा खर्च थोडा कमी होईल.

जेवणाची व्यवस्था

 

लग्नातली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण. याबाबतीत थोडे निश्चित होता येईल. कारण खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी जीएसटीमधून वगळण्यात आल्या आहेत. यामधेय दूध,मीठ ,पापड ,फळे, लोणची यांच्यावर कुठलाच कर लागणार नाहीये. तर चहा कॉफी, ब्रँडेड पनीर, ब्रँडेड गोष्टींवर, एलपीजी सिलेंडर इत्यादींवर 5 टक्के कर लागणार आहे. तर ड्राय फ्रूट्स, तुप, लोणी, मासे यावर 12 टक्के कर लागणार आहे. आणि आईस्क्रीम, सॉस, सुप, मिनरल वॉटर वर 18 टॅक्स लागेल.

लग्नासाठी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मंडप.

आज काल लग्न कार्यालयात केली जातात. आतापर्यंत या हॉल्सवर , मंगल कार्यालयांवर 21ते 25 टक्के कर बसत होता. आता तो फक्त 18 टक्के लागणार आहे. पण जर तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न करत असाल तर मात्र 28 टक्के कर लागणार आहे. मग तुमचा खर्च वाढू शकतो. तुमचा चपला बुटांवरचा खर्च कमी होणार आहे. कपड्यांवरच्या खर्चात काही जास्त फरक येणार नाही.

तर अशाप्रकारे तुमचा लग्नावरचा खर्च थोडा कमी निश्चितच होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 06:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close