बलात्कार प्रकरणी कठोर कायदा, होणार फाशीची शिक्षा - मेहबुबा मुफ्ती

लहान मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांमध्ये आता आरोपीला थेट फाशीची शिक्षा देण्याचा कायदा लवकरच आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2018 11:07 AM IST

बलात्कार प्रकरणी कठोर कायदा, होणार फाशीची शिक्षा - मेहबुबा मुफ्ती

13 एप्रिल : जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी कठुआ गावात झालेल्या बलात्कार प्रकरणावर अखेर ट्विटरवरून ठोस निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. लहान मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांमध्ये आता आरोपीला थेट फाशीची शिक्षा देण्याचा कायदा लवकरच आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

कठुआ येथील बकरवाल समाजातील एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार आणि नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जम्मू काश्मीरमध्ये घडला आहे. गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात चक्क पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे यावर कठोर कायदा आणणार असल्याच मेहबुबा यांनी म्हटलं आहे.

 

 

काश्मीर सरकार येणाऱ्या काळात बलात्काराविरोधात कठोर कायदा करणार आहे. ज्यामध्ये दोषींना मृत्यूची शिक्षा असणार आहे. ज्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे, त्याबाबतचा हा मोठा खुलासा म्हणावा लागेल. कारण या बलात्काराच्या विरोधात बॉलिवूड पासून ते राजकीय लोकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे.

या प्रकरणावरून मेहबुबा ट्विटमध्ये म्हणाल्या की, 'लहान मुलींवर होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी आम्ही कठोर कायदा आणणार आहोत. ज्याने प्रत्येक स्त्रीला न्याय मिळेल. या प्रकरणाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, 'आता एखाद्याच्या गैरकृत्यावर आणि त्याच्या दबावाखाली कायदा येणार नाही. योग्य त्या कायद्याचे पालन केले जाईल. याबद्दल वेगाने तपास सुरू आहे. योग्य तो न्याय मिळेलच.' असंही त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 11:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...