मोदी चौकीदार झाले तर त्यांना 'शिट्टी' आणि 'टोपी' देणार - ओवेसी

मोदी चौकीदार झाले तर त्यांना 'शिट्टी' आणि 'टोपी' देणार - ओवेसी

देशाला पंतप्रधान पाहिजे चहावाला किंवा पकोडेवाला नाही.

  • Share this:

हैदराबाद 25 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी खरच चौकीदाराच्या नौकरीसाठी इच्छुक असतील तर मी त्यांना शिट्टी आणि टोपी भेट देईल असं वादग्रस्त विधान MIM चे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांनी केलंय. हैदराबाद इथं झालेल्या प्रचारसभेत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

अकबरूद्दीन ओवेसी म्हणाले, मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी आपल्या नावांच्या मागे ट्ट्विटरवर चौकीदार हा शब्द लावला आहे. त्यांनी फक्त ट्विटरवरच्याच नावात बदल केला. त्यांनी आपले मतदान ओळखपत्र आणि आधार कार्डाच्या नावातही बदल केला पाहिजे.

देशाला पंतप्रधान पाहिजे चहावाला किंवा पकोडेवाला नाही. मोदींना खरोखरच चौकीदारी करण्याची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन असंही ते म्हणाले.

काँग्रेसच्या चौकीदार चोर है या आरोपांना उत्तर देताना भाजपने मै भी चौकीदार ही मोहिम सुरू केली होती. त्यावर देशभर वादळ निर्माण झालं होतं.फक्त पंतप्रधान मोदी यांनीच नाही तर भाजपच्या सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनीही आपल्या ट्विटरवरच्या नावापुढे चौकीदार हा शब्द लावला होता.

येत्या 31 मार्चला पंतप्रधान मै भी चौकीदार यावर एक कार्यक्रमही करणार असून ते देशभरातल्या लोकांशी या विषयावर संवाद साधणार आहेत. ओवेसींच्या या भडक वक्तव्यावर वाद होण्याची शक्यता आहे.

First published: March 25, 2019, 1:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading