Elec-widget

'राहुल गांधी पंतप्रधान झाल्यानंतर मिळणाऱ्या 6000 रुपयांमधून पोटगी देईन'

'राहुल गांधी पंतप्रधान झाल्यानंतर मिळणाऱ्या 6000 रुपयांमधून पोटगी देईन'

'राहुल गांधी पंतप्रधान झाल्यानंतर मिळणाऱ्या 6 हजारातून बायकोला पोटगी देईन' असा दावा एका व्यक्तीनं केल्यानं सर्वजण आवाक झाले.

  • Share this:

इंदौर, 30 मार्च : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबाच्या खात्यात वर्षाला 72 हजार जमा करण्याचं आश्वासन नुकतंच दिलं. राहुल गांधी यांच्या या निवडणूक घोषणेच्या आधारे इंदूरमधील एका व्यक्तीनं कौटुंबिक न्यायालयामध्ये अजब दावा केला आहे. त्याने केलेल्या दाव्यानं सर्व जण अवाक झाले.


आनंद शर्मा यांची घटस्फोटाची केस इथल्या कुटुंब न्यायालयात सुरू होकी. कौटुंबिक न्यायालयानं आनंद यांनी पत्नी आणि मुलीला पोटगी म्हणून महिना 4500 रुपये देण्याचे आदेश दिले. त्यावर आपली बाजू मांडताना आनंद शर्मा यांनी आपण बेरोजगार असल्याचा दावा केला. 'मी बेरोजगार आहे. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार मी महिना 4500 रूपये देण्यास असमर्थ आहे. राहुल गांधी यांचं सरकार आल्यानंतर गरिबांना, बेरोजगारांना महिना 6००० रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे मी असं लिहून देतो की, राहुल गांधी पंतप्रधान झाल्यानंतर मला मिळणाऱ्या 6000 पैकी 4500 रुपये मी पत्नीला देईन. न्यायालय त्या वेळी 4500 रुपये पत्नीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देऊ शकतं', असं  चक्क आनंदने प्रतिज्ञापत्रामध्ये लिहून दिलं आहे. आनंद शर्मा यांच्या दाव्यामुळे न्यायालयाचील सर्वच जण आवाक झाले. दरम्यान, पुढील सुनावणी ही 29 एप्रिल रोजी होणार आहे.

पत्नीला महिना 3 हजार रुपये आणि मुलगी आर्याला महिना 1500 रूपये देण्याचे आदेश न्यायलयानं दिले आहेत. 2006मध्ये आनंद शर्माचा विवाह झाला आहे.


Loading...

आज रात्री जगभरात 1 तास राहील वीज बंद, जाणून घ्या कारण


राहुल गांधींची घोषणा?

काँग्रेस सत्तेवर आली तर देशातल्या गरीबांना वर्षाला 72००० रुपये देण्यात येतील अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. देशात 20 टक्के गरीब असून त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. देशात भरपूर पैसे असून हे पैसे देणे शक्य आहे असा दावाही त्यांनी केला. ज्यांचं उत्पन्न 12 हजारांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.



5 कोटी कुटुंब आणि 25 कोटी लोकांना या योजनेचा थेट फायदा होईल असा दावाही त्यांनी केला. या आधीही राहुल गांधी यांनी गरिबांना किमान वेतन देण्याची घोषणा केली होती.

VIDEO: 'आपला पंतप्रधान कोण?' उद्धव ठाकरे म्हणाले...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...