• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • ...तर भुजबळांसोबत एकत्र येईल-एकनाथ खडसे

...तर भुजबळांसोबत एकत्र येईल-एकनाथ खडसे

"लढ्यासाठी भविष्यात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांसह कुणासोबतही एकत्र येईल आणि यात काहीही गैर नाही"

  • Share this:
नवी दिल्ली, 14 जून : ओबीसी समाजाच्या लढ्यासाठी भविष्यात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांसह कुणासोबतही एकत्र येईल आणि यात काहीही गैर नाही असं सूचक वक्तव्य माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलंय. न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींशी बोलताना एकनाथ खडसे यांनी, माझ्यावर नको ते आरोप करण्यात आले. पण हाती काहीही लागलं नाही. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. या बेछुट आरोपांमुळे माझी राजकीय कारकीर्द बदनाम करून वाया घालवली. हे सर्व करण्यामागे भाजपच्या मंत्र्यांचा हात आहे अशी माहिती कल्पना इनामदार यांनी न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवला आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.

VIDEO : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारा, हाच तो व्हिडिओ

गेल्या काही वर्षांपासून ओबीसी समाजासाठी नेतृत्व करण्यात खंड पडला. याआधी गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व केले. त्यांच्या जाण्यानंतर छगन भुजबळ यांनी नेतृत्व सांभाळले. पण छगन भुजबळ जेलमध्ये गेल्यामुळे दोन वर्ष ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण पसरले होते. आता भुजबळ जेल बाहेर आले असल्यामुळे ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण आहे.  ओबीसींवर अन्याय होत असल्याची सार्वत्रिक भावना आहे. ओबीसी नेत्यांना लक्ष्य केले जातेय असं लोकांना वाटतंय असं परखड मत खडसेंनी व्यक्त केलं. पुणेकर तरुणी ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीत! भविष्यात छगन भुजबळांसोबत एकत्र येणार का ?, या प्रश्नावर खडसे म्हणाले की, ओबीसी लढ्यासाठी मी पहिल्यापासून भुजबळांसोबत आहे. ओबीसींच्या हितासाठी भविष्यात भुजबळांसह कुणासोबतही एकत्र येईल. जे जे ओबीसी समाजासाठी करता येईल त्यासाठी मी सोबत असेल असं खडसे म्हणाले.

हाच का पुरोगामी महाराष्ट्र? विहिरीत पोहल्यानं मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड

एकंदरीतच छगन भुजबळ जेलबाहेर आल्यानंतर ओबीसी समाजाची आशा पल्लवीत झाली असून खडसे आणि भुजबळ हे दोन्ही नेते उद्या एकाच व्यासपीठावर पाहण्यास मिळाले तर वेगळं ठरणार नाही.
First published: