राहुल गांधीं पाठोपाठ PM मोदी देखील आक्रमक; केंद्रातील पुढील सरकार भाजपचेच!

राहुल गांधीं पाठोपाठ PM मोदी देखील आक्रमक; केंद्रातील पुढील सरकार भाजपचेच!

ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं, त्याचं उद्घाटन देखील मीच करणार अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

  • Share this:

लेह, 3 फेब्रुवारी : 2019च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. 'लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला विजय मिळेल' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते लेह विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान म्हणून मीच या इमारतीचं लोकार्पण करेन. 'सेवा करण्याची संधी तुम्ही मला द्याल' असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केलं. इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर जाहीर सभेदरम्यान त्यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला नक्की विजय मिळेल, अशी आशा व्यक्त केली.

जाहीर सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं, त्याचं लोकार्पण देखील माझ्याच काळात झालं. आता, लेह विमानतळावरील या नवीन इमारतीचं लोकार्पण देखील माझ्या हस्ते होईल' असं आश्वासन उपस्थित जनसमुदायाला देत भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. शिवाय, मागील 5 वर्षामध्ये देशाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असा दावा देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी देखील अंतरिम आर्थिक बजेट सादर केल्यानंतर पुढील बजेट देखील भाजप सरकारच सादर करेल असा दावा करत लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळणारच असा विश्वास देखील नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, यावेळी बोलताना लेह - लडाख - कारगिल भारताचा अभिमान आहेत. या भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारनं मागील चार वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसेच आगामी काळात देखील या भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्द असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. शिवाय, या भागातील पर्यटन, रोजगार आणि शिक्षणासाठी देखील केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनसमुदायासमोर स्पष्ट केलं.

आनंदीबेन पटेल म्हणाल्या, 'मोदी साहेबांची काळजी घ्या'; VIDEO व्हायरल

First published: February 3, 2019, 1:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading