Home /News /national /

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटणार? सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार महत्त्वाची सुनावणी

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटणार? सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार महत्त्वाची सुनावणी

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात बैलगाडा शर्यत भरवणं भोवलं, 200 जणांवर गुन्हा दाखल

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात बैलगाडा शर्यत भरवणं भोवलं, 200 जणांवर गुन्हा दाखल

Bullock cart race in Maharashtra: बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : राज्यात बैलगाडा आणि बैलांच्या शर्यतीला (bullock cart race) बंदी आहे. बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी बैलगाडा शर्यत प्रेमींकडून वारंवार होत आहे. मुंबई हायकोर्टाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. त्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) या याचिकेवर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मान्य केली आहे. येत्या सोमवारी या संदर्भात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचं खासकरुन ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष या सुनावणीकडे लागलेले आहे. तमिळनाडूमधील ‘जल्लिकट्टू’ या बैलांच्या खेळाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागांत बैलगाडी-बैलगाडा शर्यती होण्याचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करून त्याविषयीच्या नियमांचा मसूदा तयार केला आहे. राज्यातील विविध भागांत दिवाळी दरम्यान बैलगाडा शर्यतीचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असतं. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शर्यतींवरील बंदी पुढच्या काही आठवड्यांसाठी कायम ठेवल्याने यंदाच्या दिवाळी दरम्यान राज्यात शर्यती होऊ शकल्या नव्हत्या. आता सर्वोच्च न्यायालय या बंदीवर काय प्रतिक्रिया देतं आणि ही बंदी उठवली जाते का? आणि पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. बैलगाडा शर्यत भरवणं पडलं महागात, 200 जणांवर गुन्हा दाखल बैलगाडा शर्यत आयोजनावर बंदी असतानाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात बैलगाडा शर्यत भरवण्यात आली. याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. एकूण 200 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात आंबेगाव तालुक्यातील गिरवली आणि वडगाव काशिंबे गावात दिवाळी पाडव्याच्या दिवशी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. घोडेगाव पोलीसांत पाच जणांसह 100 अज्ञातांवर, तर मंचर पोलिसांत पाच जणांसह 100 अज्ञातांवर भा. द. वि. क. 188, प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (अ), म.पो.का.क. 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, या ठिकाणी कोरोनाच्या नियम पायदळी तुडवण्यात आले. जमलेल्या गर्दीमध्ये कुणीही साधे मास्क सुद्धा वापरले नव्हते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र, मंचर आणि घोडेगाव पोलिसांचे बैलगाडा घाटाकडे दुर्लक्ष होते. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा मात्र दाखल झालेला नव्हता. डोंबिवलीत बैलगाडा शर्यतींचा धुराळा मे महिन्यात सुद्धा डोंबिवलीत बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. डोंबिवली जवळील अंतार्ली (Antarli Village Dombivali) गावात या बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत कोरोना नियमांना पायदळी तुडवत या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस मात्र या सर्वापासून अनभिज्ञ असल्याचं पाहायला मिळत आहे.
First published:

Tags: Maharashtra, Supreme court

पुढील बातम्या