Home /News /national /

निवडणुकीत मतदारांना पैसे वाटणाऱ्या खासदाराला होणार का तुरुंगवास? कोर्टाच्या निर्णयानंतर उचललं पाऊल

निवडणुकीत मतदारांना पैसे वाटणाऱ्या खासदाराला होणार का तुरुंगवास? कोर्टाच्या निर्णयानंतर उचललं पाऊल

कोर्टाने महिला खासदाराला मतदारांना पैसे वाटल्या प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

    हैदराबाद, 25 जुलै : तेलंगणामध्ये एका लोकसभा खासदाराला मतदारांमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपाखाली एका स्थानिक न्यायालयाने 6 महिन्याची कैद आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तेलंगना राष्ट्र समितीच्या खासदार एम. कविता आणि त्याचे सोबतीला न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. (Will an MP who distributes money to voters in elections be imprisoned) यानंतर महिला खासदाराने उच्च न्यायालयात अपील केली असून सध्या दोघांना जामीन मिळाला आहे. कविता तेलंगणाच्या महबुबाबाद लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. लोकसभा खासदाराला न्यायालयाने अशा प्रकारची शिक्षा सुनावणे ही देशातील पहिलीच घटना असेल. हे ही वाचा-गुरुपौर्णिमेला भय्यू महाराजांच्या आश्रमावर नेत्यांची हजेरी, मात्र मुलगीच गैरहजर हे प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित या सर्वांना खासदार-आमदार विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणानुसार, 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी, फ्लाइंग स्क्वॉडने निवडणुकीदरम्यान मतदारांना पैसे वाटप करताना खासदार यांचे साथीदार शौकत अली यांना रंगेहाथ पकडले. सरकारी वकील म्हणाले की, पकडल्यानंतर या लोकांनी कविताच्या बाजूने मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटण्याचे कबूल केले होते. या प्रकरणात शौकत अली आणि कविता दोघेही आरोपी आहेत. दोघांनाही दोषी समजून न्यायाधीशांनी आता त्यांना आयपीसीच्या कलम 171-ई अंतर्गत शिक्षा सुनावली आहे. दोघांनाही 6 महिन्यांची साधी कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. परंतु, जामीन मंजूर करताना कोर्टाने उच्च न्यायालयात अपील करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Loksabha, Telangana

    पुढील बातम्या