पत्नीचा मृतदेह घरात, तर पतीची रेल्वे ओव्हरब्रिजवर गळा आवळून हत्या; नवविवाहित जोडप्याच्या हत्येचं गूढ

पत्नीचा मृतदेह घरात, तर पतीची रेल्वे ओव्हरब्रिजवर गळा आवळून हत्या; नवविवाहित जोडप्याच्या हत्येचं गूढ

अभिषेकचं कोणासोबत वैर नव्हतं. त्यामुळे त्या दोघांच्या हत्येमागे कोण असेल याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

  • Share this:

गया, 01 मे : बिहारमधील गया (Gaya) येथे एका नवविवाहित जोडप्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या  प्रकरणामुळे भागात खळबळ उडाली आहे. या घटनेत मारेकऱ्याने नवरा-बायकोचा गळा आवळून खून केला.

ही घटना बुनियादगंज पोलीस स्टेशन परिसरातील खानजहापूर गावची आहे. सीमाज कुमारी या महिलेचा मृतदेह खानजहांपूर येथील त्यांच्या  घरात सापडला आहे. घरापासून सुमारे एक किलोमीटरवर मुफस्सिल पोलीस स्टेशन परिसरातील रेल्वे ओव्हरब्रिजजवळ तिचा पती अभिषेक कुमार याचा मृतदेह आढळला.

नव्यानेच सुरू केला होता संसार

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक मूळचा जहानाबाद येथील मखदूमपूरचा रहिवासी होता आणि तो बनियागडगंजच्या खानजहांपुरात येथे नवीन घर बांधून आपली पत्नी सीमा हिच्यासह राहत होता. नोव्हेंबर 2019 मध्ये दोघांनी थाटामाटात लग्न केले. गुरुवारी सकाळी मुफस्सिल पोलीस स्टेशनमध्ये एका युवकाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी रेल्वेच्या ओव्हरब्रिजवरून युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला. आवश्यक कारवाईनंतर पोलिसांनी मृतदेह अज्ञात समजून त्याला पोस्टमार्टमसाठी एएनएमसीएच येथे पाठविले.

प्रथम नवरा नंतर पत्नीचा मृतदेह सापडला

दरम्यान, दुपारनंतर अभिषेकची पत्नी सीमा कुमारी हिच्या हत्येची बातमी शेजारच्या लोकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर बुनियाडगंज पोलिसांनी सीमाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि  पोस्टमॉर्टमसाठी एएनएमसीएच येथे पाठविला. घरात इतर कोणीचं नव्हतं, यामुळे पत्नीचा खून करून अभिषेक फरार झाल्याचा ग्रामस्थांना संशय आला. सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी हे सासरच्यांनी केल्याच्या संशयातून सीमाच्या माहेरच्यांना याची माहिती दिली.

पोलिसांकडून तपास सुरू

नवविवाहित सीमा कुमारीच्या हत्येची बातमी ऐकताच तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. येथे सीमाच्या बहिणीने तिची ओळख पटवली. तसेच, मुफस्सिल पोलीस स्टेशनने अज्ञात म्हणून पाठविलेला मृतदेह तिचा नवरा अभिषेक कुमार असल्याची माहिती समोर आली. पती-पत्नीच्या निर्दयी हत्येच्या वृत्ताने कुटुंबासमवेत ग्रामस्थही हैराण झाले आहेत. ही दुहेरी हत्या कोणी केली हे त्यांना समजले नाही. बुनियादजंग आणि मुफस्सिल ठाण्यातील पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आहे. मात्र या हत्येमागचं गूढ कायम आहे.

संबंधित -आमच्या देशाने हिंदूंना दुबईत प्रवेश नाकारला तर... राजकन्येचा भारतीयांना प्रश्न

 

 

 

First published: May 1, 2020, 7:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading