Home /News /national /

DTH Dish Recharge संपताच बायकोने मागितला Divorce; नवऱ्याला म्हणाली, 'TV नहीं तो बीवी नहीं'

DTH Dish Recharge संपताच बायकोने मागितला Divorce; नवऱ्याला म्हणाली, 'TV नहीं तो बीवी नहीं'

250 रुपयांच्या टीव्ही रिचार्जसाठी घटस्फोटाचं प्रकरण पाहून पोलीसही हैराण झाले.

    विलासपूर, 30 जून : 'नोकरी नहीं तो छोकरी नहीं', हे तुम्हाला माहिती असेल पण 'टीव्ही नहीं तो बीबी नहीं' असं कधी ऐकलं आहे का? सध्या असंच एक विचित्र प्रकरण चर्चेत आलं आहे. एका दाम्पत्याचा संसार टीव्हीच्या रिचार्जमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आला (Wife husband disputes).  टीव्हीचा रिचार्ज संपला म्हणून  बायकोने आपल्या नवऱ्याकडून घटस्फोट मागितला आणि सासर सोडून ती आपल्या माहेरी निघून गेली. छत्तीसगढच्या विलासपूरमधील हे प्रकरण आहे (Wife want divorce from husband after tv recharge end). नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचतात. याआधी घरात टॉयलेट नाही म्हणून बायको माहेरी निघून गेली हे तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं असेल. प्रत्यक्षातही असं एखादं प्रकरण तुम्हाला माहिती असेल. पण कधी कुणी टिव्हीच्या रिचार्जचं कारण देत माहेरी निघून गेलं आणि घटस्फोट मागितला हे मात्र अजबच आहे. जेव्हा हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं तेव्हा तेसुद्धा हैराण झाले. हे वाचा - कितीही भांडलात तरी नातं कधीच तुटणार नाही; प्रत्येक कपलने फॉलो करावेत हे रूल्स पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार डिश टीव्हीचा रिचार्ज संपल्याने पत्नी आपलं सासर सोडून माहेरी निघून गेली. नवऱ्याची चूक फक्त इतकीच की त्यावेळी रिचार्ज करण्यासाठी त्याच्या खिशात पैसे नव्हतं. संध्याकाळी कामाहून परतल्यानंतर रिचार्ज करतो, असं त्याने सांगितलं. यामुळे पत्नी माहेरी गेली. कारण तिला टीव्हीशिवाय एक क्षणही तिथं राहायचं नव्हतं.  टीव्ही नहीं तो बीबी नहीं असं तिने आपल्या पतीलाही सांगितलं होतं. काऊन्सिंगदरम्यान बायकोने सांगितलेलं घटस्फोटाचं कारण ऐकून पोलिसांना धक्काच बसला. बिलासपूर महिला पोलीस ठाण्यातील समुपदेशक नीता श्रीवास्तव यांनी सांगितलं, फक्त 250 रुपयांचा टीव्हीचा रिचार्ज न केल्याने पत्नी माहेरी निघून गेली, हे ऐकून आम्हीही हैराण झालो. या छोट्याशा गोष्टीवरून पती-पत्नी इतका वाद झाला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. हे वाचा - काय सांगता! लोकांना सकाळी झोपेतून उठवण्याच्या कामाचे महिन्याला मिळतात 26 लाख रूपये या दाम्पत्याचं समुपदेशन करण्यात आलं आहे. पती-पत्नी दोघांनाही समजावण्यात आलं. काऊन्सलर नीता यांनी सांगितलं की, किरकोळ वाद होणं हा आयुष्याचा भाग आहे. पण वाद इतका मोठा करायला नको. काही दिवसांच्या काऊन्सिलिंगनंतर नवरा-बायको दोघांनीही समुपदेशकांचं ऐकलं. यामुळे एक संसार उद्ध्वस्त होता होता वाचला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Chattisgarh, Couple, Relationship, Wife and husband

    पुढील बातम्या