मराठी बातम्या /बातम्या /देश /

पत्नी म्हणाली, 'मी 10 पुरूषांसोबत संबंध ठेवणार, काय करशील'? ऐकताच पतीने उचललं टोकाचं पाऊल

पत्नी म्हणाली, 'मी 10 पुरूषांसोबत संबंध ठेवणार, काय करशील'? ऐकताच पतीने उचललं टोकाचं पाऊल

आरोपी हा खंडसरा येथील राहणारा आहे. त्याने दोन महिन्यांआधीच पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती.

आरोपी हा खंडसरा येथील राहणारा आहे. त्याने दोन महिन्यांआधीच पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती.

आरोपी हा खंडसरा येथील राहणारा आहे. त्याने दोन महिन्यांआधीच पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती.

  • Published by:  News18 Desk
दुर्ग, 11 जुलै : छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीचे नाते (Husband Wife Relation) सात जन्माचे असे म्हणतात. पती-पत्नीमध्ये वादही (Husband Wife Dispute) होतात आणि ते पुन्हा एकत्रही होता. मात्र, घटस्फोटापर्यंत (Divorce) गेलेल्या प्रकरणात पत्नीने पतीला जे सांगितलं, त्यानंतर त्याने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली. (Husband Killed his Wife Chhattisgarh) काय आहे संपूर्ण प्रकरण - पती आणि पत्नीमध्ये वाद झाल्यावर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले होते. यावेळी पत्नी नाराज झाली होती. त्यामुळे ती पतीला म्हणाली की, घटस्फोट झाल्यावर ती 10 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवणार तसेत तो तिला काहीच करू शकणार नाही. हे ऐकल्यावर पतीला भयानक राग आला आणि या रागातूनच त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. यानंतर स्वत:च पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ही घटना छत्तीसगढच्या बेमेतरा जिल्ह्यातील आहे. आरोपी हा खंडसरा येथील राहणारा आहे. त्याने दोन महिन्यांआधीच पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, आपल्या पत्नीसोबत तो लखनऊ येथे काम करण्यासाठी गेला होता. याठिकाणी त्याने त्याच्या पत्नीला एका दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडले. यानंतर त्यांच्यात जोरदार भांडण झाले आणि दोन्ही 5 जुलैला दुर्ग येथे परत आले. यानंतर पतीने तिच्यापासून घटस्फोट घ्यायचा विचार केला. तशी प्रक्रियाही त्याने सुरू केली. मात्र, 7 जुलैला पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडण इतके टोकाला गेले की पत्नी पतीला म्हणाली, मी तुझ्यासमोर याच घरात 10 पुरूषांसोबत शारीरिक संबंध ठेवणार आणि तु काहीच करू शकणार नाही. आपल्याच पत्नीच्या तोंडून हे ऐकल्यावर त्याने टोकाचे पाऊल उचलले आणि आपल्या पत्नीची गळा आळवून हत्या केली. हेही वाचा - वहिनीच्या प्रेमात बेधुंद दीर, 21 दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या पत्नीसोबत केलं भयानक कृत्य ही हत्या आत्महत्या आहे, असे दाखवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह हा दोरीला बांधून लटकवला. तसेच पोलिसांना फोन करत सांगितले की, त्याच्या पत्नीने आत्महत्या केली असे सांगत खोटी कहाणी रचली. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. तसेच एका चरित्रहीन पत्नीला अशीच शिक्षा दिली जाऊ शकते, त्यामुळे आपल्याला आपण केलेल्या चुकीचा पश्चात्ताप नाही, असे त्याने सांगितले.
First published:

Tags: Chhattisgarh, Murder news, Wife, Women extramarital affair

पुढील बातम्या