धक्कादायक! 'वाईफ स्वॅपिंग'ला नकार देताच पतीने मित्रांसह पत्नीवर केला बलात्कार

धक्कादायक! 'वाईफ स्वॅपिंग'ला नकार देताच पतीने मित्रांसह पत्नीवर केला बलात्कार

'तू तयार झालीस तर मलाही मित्रांच्या पत्नींसोबत शरिरसंबंध ठेवता येतील', अशी विचित्र मागणी करत पतीने तिच्यावर बलात्कार केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : पत्नीने वाईफ स्वॅपिंगला नकार दिल्यानं रागावलेल्या पतीनं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. नराधम पतीने एवढ्यावरच न थांबता दुष्कृत्याचा व्हिडिओदेखील बनवला आहे. या व्हिडिओ शूटिंगला व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्रांनाही पत्नीवर बलात्कार करायला सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत राहणाऱ्या पीडित महिलेनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तिनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पती दारूच्या आहारी गेला आहे. त्याच्याकडून वारंवार त्याच्या मित्रांसोबत शारिरीक संबंधांसाठी दबाव टाकला जात होता. तु जर होकार दिलास तर मला माझ्या मित्रांच्या पत्नीसोबत संबंध ठेवता येतील असंही पतीकडून सांगिलतं जायचं असा आरोप पत्नीनं केला आहे.

पतीकडून सातत्यानं दबाव आणला जात होता. तरीही त्याच्या मागण्यांना दाद दिली नाही. तसेच मी यासाठी कधीच तयार होणार नाही असं पतीला स्पष्ट सांगितलं. यावरून पती-पत्नीमध्ये वाद व्हायचा. दारूच्या नशेत पतीकडून तिला मारहाण व्हायची. एक दिवस पतीने दारूच्या नशेत पुन्हा वाईफ स्वापिंगसाठी वाद घातला. तेव्हा पत्नीने नकार दिल्यानंतर पतीने मारहाण केली. तसेच तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग केलं. त्यानंतर जर तू तयार झाली नाहीस तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

पत्नीला एका खोलीत कोंडून पतीने त्याच्या मित्रांना खोलीमध्ये पाठवलं. त्यानंतर दोन्ही मित्रांनी पत्नीवर बलात्कार केला. त्यांनी तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं असंही पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत पीडित महिलेनं म्हटलं आहे.

पीडित महिलेच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. महिलेनं या प्रकारानंतर पती आणि त्याच्या दोन मित्रांनी बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मुंबईच्या खड्ड्यांवर RJ मलिष्काचं नवं गाणं, पाहा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 19, 2019, 2:58 PM IST
Tags: delhi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading