1971पासून पाकमध्ये बंदी असलेल्या पतीच्या सुटकेसाठी पत्नीचा 46 वर्षं लढा

1971पासून पाकमध्ये बंदी असलेल्या पतीच्या सुटकेसाठी पत्नीचा 46 वर्षं लढा

१९७१च्या युद्धात पाकनं बंदी बनवलेले फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे अजूनही पाकिस्तानात आहेत.

  • Share this:

23 एप्रिल : भारताचा जवान चंदू चव्हाण पाकमधून परत आला. कुलभूषण जाधवच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. पण १९७१च्या युद्धात पाकनं बंदी बनवलेले फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे अजूनही पाकिस्तानात आहेत. त्यांच्या पत्नी, दमयंती तांबे त्यांच्या सुटकेसाठी गेली ४६ वर्षं लढतायेत. दिल्लीत संरक्षण मंत्रालयाचे उंबरे झिजवतायेत. पण आता ५ दशकं होत आली, त्यांच्या नशिबी आलं ते फक्त वाट बघणं.

काही वर्षांपूर्वी जागतिक कीर्तीच्या टाईम मॅगझीननं त्यांच्या पतीचा पाकमधला फोटोही छापला. तिथल्या इतर भारतीय कैद्यांनी दमयतींना मदतीची पत्रंही लिहिली. त्या स्वतः दोन वेळा पाकिस्तानात गेल्या. तिथल्या कोर्टाकडून दिलासा मिळाला पण दोन्ही बाजूच्या सरकारांची अनास्था मध्ये आली.

भारत-पाकमधले कायमच तणावाचे संबंध आणि दिल्लीतली बाबूगिरी. यामुळे त्या अजूनही आपल्या पतीची वाट बघतायेत. चंदू चव्हाणची बातमी बघून त्या तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांना भेटल्या. थोडी आशा निर्माण झाली. पण तितक्यात पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले. आणि दमयंतींची प्रतीक्षा पुन्हा सुरू झाली.

कागदोपत्री बघायला गेलं तर सरकारी फाईलींसाठी त्यांचे पती १९७८ सालीच मृत समजले गेले. कारण नियमांनुसार बेपत्ता होऊन ७ वर्षं उलटली की सरकार त्या अधिकाऱ्याला मृत समजतं. निदान कुलभूषण जाधव यांचं तरी असं होऊ नये, असं त्यांना मनापासून वाटतं.

First published: April 23, 2017, 1:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading