तिरुपती, 21 जानेवारी: नातं कोणतंही असलं तरी ते टिकवून ठेवण्यासाठी नात्यात विश्वास असणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळी विश्वास संपतो, तेव्हा नात्याला काहीही अर्थ उरत नाही. एखादा छोटासा संशय देखील संपूर्ण संसार उद्ध्वस्त करू शकतो. याचा प्रत्यय नुकताच आला आहे. विवाहबाह्य संबंध सुरू असल्याच्या संशयातून एका महिलेनं आपल्या पतीची निर्घृण हत्या (Husband's brutal murder by wife) केली आहे. तिने आपल्या पतीला चाकुने भोकसून हत्या (Attack with knife) करत, त्याचं शीर धडावेगळं (Slit throat) केलं आहे. एवढंच नव्हे तर महिलेनं संबंधित शीर एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून थेट पोलीस स्टेशन गाठलं आहे.
पोलीस ठाण्यात जाऊ महिलेनं आत्मसमर्पण करत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून पोलीस देखील हैराण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत महिलेला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना आंध्र प्रदेशातील (Andhra pradesh) तिरुपती (Tirupati) येथील असून हत्या झालेल्या 53 वर्षीय पतीचं नाव रवीचंद्रन असं आहे. तर वसुंधरा असं अटक केलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे.
हेही वाचा-सोलापूर: बहिणीची बदनामी नाही झाली सहन; मेहुण्याने भाऊजीला दिली भयंकर शिक्षा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रवीचंद्रन आणि आरोपी महिला वसुंधरा यांचा विवाह 25 वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर ते रेनीगुंटामधल्या बुग्गा स्ट्रिट परिसरात राहात होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला असून तो आता 20 वर्षांचा आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना, गेल्या काही महिन्यांपासून मृत रवीचंद्रन आणि वसुंधरा यांच्यात भांडणं व्हायची. गुरुवारी रात्रीदेखील रवीचंद्रन आणि वसुंधरा यांच्यात वाद झाला होता.
हेही वाचा-बाबो! पार्टी देण्यास नकार दिल्याने कोयत्याने केले वार, पुण्यातील तरुणाचा प्रताप
याच वादातून वसुंधरा यांनी आपल्या पतीवर चाकुने वाकडे-तिकडे कसेही सपासप वार केले आहेत. या हल्ल्यात रवीचंद्रन यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर वसुंधरा यांनी पतीचं शीर कापून ते प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकलं आणि थेट रिक्षाने पोलीस स्टेशन गाठलं. याठिकाणी त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. रवीचंद्रन यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय वसुंधरा यांना होता. यातूनच ही हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.