पत्नीच्या जाचाला कंटाळून 2015 मध्ये ६४ हजार पतींच्या आत्महत्या

पत्नीच्या जाचाला कंटाळून 2015 मध्ये ६४ हजार पतींच्या आत्महत्या

पुणे पोलिसांच्या महिला सहाय्यक कक्षाकडे आता पुरुष आपल्यावरील अत्याचाराच्या विरोधात तक्रारी दाखल करत आहेत

  • Share this:

23 मे : पतीकडून,सासरच्या मंडळींकडून महिलांवरील अत्याचाराच्या घटना समाजाला नव्या नाहीत. पण आता महिलांकडून पुरुषांच्या छळाच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

पुणे पोलिसांच्या महिला सहाय्यक कक्षाकडे आता पुरुष आपल्यावरील अत्याचाराच्या विरोधात तक्रारी दाखल करत आहेत. सोशल मीडिया वापर, सासू सासऱ्यांकडून संशय,​ पगारामधील तफावती अशा वेगवेगळ्या कारणावरून छळ होत​ असल्याची पुरुषांची तक्रार आहे.

2016 मध्ये पूर्ण वर्षभरात एकूण 328 तक्रारी आल्यात. तर 2017 या वर्षात जानेवारी ते मे महिन्यात 130 तक्रारी आल्या आहेत.

तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या विवाहीत पुरुषांनी पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे.

२०१४ मध्ये ५९ हजार ७४४ लोकांनी आपली जीवनयात्रा संपवलीये. तर  २०१५ मध्ये हा आकडा वाढला असून तो ६४ हजार ५३४ वर पोहोचलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2017 11:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading