मराठी बातम्या /बातम्या /देश /

क्वारंटाइन झोनमध्ये काम कऱणाऱ्या पतीचा मृत्यू, धक्क्यामुळे पत्नीने घेतला अखेरचा श्वास

क्वारंटाइन झोनमध्ये काम कऱणाऱ्या पतीचा मृत्यू, धक्क्यामुळे पत्नीने घेतला अखेरचा श्वास

अचानक कोसळलेल्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

अचानक कोसळलेल्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

आरोग्य कर्मचारी असलेल्या पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीला धक्का बसला. त्यानंतर हृदविकाराच्या झटक्याने पत्नीचाही मृत्यू झाला.

  • Published by:  Suraj Yadav
उज्जैन, 26 एप्रिल : कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आरोग्य कर्मचारी दिवस रात्र काम करत आहेत. आतापर्यंत काही डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान उज्जैन इथं क्वारंटाइन झोनमध्ये काम करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. गेल्या दहा दिवसांपासून आरोग्य कर्मचारी नियाज खान क्वारंटाइन झोनमध्ये जेवण वाढायचं काम करत होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेगम बाग इथं राहणाऱ्या एएनएम नियाज खान हे आरोग्य कर्मचारी म्हणून काम करत होते. गेल्या 10 दिवसांपासून क्वारंटाइन झोनमध्ये जेवण वाढण्याचं काम त्यांच्याकेड होतं. त्यांना सर्दी, खोकला आणि ताप आला होता. त्यांचे चेक अप केल्यानंतर आरडी गार्डी मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीला धक्का बसला. त्यानंतर हृदविकाराच्या झटक्याने पत्नीचाही मृत्यू झाला. नियाज खानच्या मित्रांनी सांगितलं की, तो कुष्ठरोग विभागात कार्यरत होता. त्याची ड्युटी क्वारंटाइन विभागात लागली होती. याठिकाणी संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांना जेवण पोहोचवायचं काम त्याला दिलं होतं. त्याची तब्येत बिघडल्यानंतर तिथून दुसरीकडं घालवलं. पण शनिवारी त्याला जास्त त्रास झाल्यानर रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. हे वाचा : मजुराने हज यात्रेसाठी साठवले होते पैसे, आता त्याच पैशातून गरीबांना करतोय मदत रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या भावाला आणि मुलाला घरी पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच रविवारी मुलाला नियाजचा मृत्यू झाल्याची माहिती फोनवरून देण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. तोपर्यंत पत्नीला याबाबत सांगण्यात आलं नव्हतं. मात्र याची माहिती होताच तिला धक्का बसला आणि पत्नीने अखेरचा श्वास घेतला. हे वाचा : कोरोनाग्रस्त महिलेनं दिला बाळाला जन्म, VIDEO कॉलवर चिमुकल्याला बघते आई संपादन - सूरज यादव
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या