• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • सतत Facebook वर ऑनलाइन राहाणं जीवावर बेतलं; नवऱ्याने दिली भयंकर शिक्षा

सतत Facebook वर ऑनलाइन राहाणं जीवावर बेतलं; नवऱ्याने दिली भयंकर शिक्षा

(File Photo)

(File Photo)

पत्नी सतत फेसबुकवर ऑनलाइन (wife constantly being online on facebook) असते, या कारणातून एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife's brutal murder) केली आहे.

 • Share this:
  कोलकाता, 21 सप्टेंबर: इंटरनेट आणि स्मार्ट फोन आल्यापासून अनेकांना सोशल मीडियाचं एकप्रकारे व्यसन जडलं आहे. काही काम नसलं तर अनेकजण तासन् तास सोशल मीडियावर स्क्रोलींग करत असतो. त्यामुळे आपल्या आसपास काय सुरू आहे. याचा थांगपत्ताही बऱ्याच जणांना लागत नाही. अशात पत्नी सतत फेसबुकवर ऑनलाइन (wife constantly being online on facebook) असते, या कारणातून एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife's brutal murder) केली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक (Accused husband arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना पश्चिम बंगालच्या चंदन नगर येथील आहे. हेही वाचा-बहिणीवरील बलात्काराचा घेतला विचित्र बदला; 2 भावंडांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप तर पल्लवी दास असं हत्या झालेल्या विवाहितेचं नाव असून पती रिंकू दास याला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी पल्लवी तासन् तास फेसबूकवर ऑनलाइन असते. ती नक्कीच परपुरुषासोबत गप्पा मारत असावी, असा संशय रिंकूला होता. याच संशयातून रिंकू आणि पल्लवीत अनेकदा कडाक्याचं भांडणही झालं होतं. तर काही वेळा रिंकूने पल्लवीला मारहाण देखील केली होती. हेही वाचा-महिलेनं पतीला मारण्यासाठी रचला कट; प्रोटीन पाउडरमधून द्यायची विष,असा झाला खुलासा दरम्यान फेसबुकच्या माध्यमातून पल्लवीचे विवाहबाह्य संबंध सुरू असल्याच्या संशयातून रिंकूने पल्लवीचा गळा आवळवून हत्या केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पल्लवी यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी पती रिंकूला घटनास्थळावरून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: