Home /News /national /

पतीच्या नसबंदीनंतरही महिला झाली प्रेग्नेंट; सत्य समोर आल्यानंतर नवऱ्यासह कुटुंब हैराण

पतीच्या नसबंदीनंतरही महिला झाली प्रेग्नेंट; सत्य समोर आल्यानंतर नवऱ्यासह कुटुंब हैराण

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

एका युवकानं नसबंदी (husband sterilization) केल्यानंतर 4 महिन्यांनी त्याची पत्नी गर्भवती राहिल्याचा (wife became pregnant) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमागचं सत्य ऐकून कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे.

    अजमेर, 17 मे: राजस्थानातील अजमेर याठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका युवकानं नसबंदी (husband sterilization) केल्यानंतर 4 महिन्यांनी त्याची पत्नी गर्भवती राहिल्याचा (wife became pregnant) प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर नवऱ्यासहित कुटुंबीयांची पायाखालची जमीन हादरली आहे. याप्रकरणी नवऱ्यानं पुन्हा त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, डॉक्टरांनी त्याला नसबंदी यशस्वी केली असल्याचं सांगितलं. त्यामुळे कुटुंबीयांचा सूनेवर संशय बळावत गेला आणि घरात तणावाचं वातावरण तयार झालं आहे. पतीची नसबंदी झाली असताना, पोटातलं बाळ नेमकं कोणाचं हा प्रश्न कुटुंबीयांना पडला आणि त्यांनी महिलेला छळायला सुरुवात केली. यानंतर कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेनं थेट जिल्हाधिकारी आरती डोगरा यांच्याकडे मदतीची याचना केली. जिल्हाधिकारी आरती डोगरा यांनी कुटुंबीयांची बाजू ऐकून घेतल्यानंतर या घटनेच्या तपासाला सुरुवात केली. गर्भवती महिलेनं डीएनए तपासणी करण्यास तयार असल्याचंही सांगितलं. जिल्हाधिकारी डोगरा यांनी तपास केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं आहे. हे सत्य ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनचं सरकली आहे. जिल्हाधिकारी आरती डोगरा यांनी मुख्य चिकित्सालय आणि स्वास्थ अधिकारी डॉक्टर के. के. सोनी यांना फोन करून या घटनेबाबत चौकशी केली. चौकशीत संबंधित व्यक्तीची नसबंदी डॉक्टर भगवान सिंग गहालोत यांनी केल्याचं समजलं. डॉक्टर भगवानसिंग गहलोत यांनी केलेली नसबंदीची शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे. हे ही वाचा-महिलांनो जागरुक व्हा! हे Legal Rights माहित आहेत का? यानंतर, डॉक्टर सोनी यांनी संबंधित गैरप्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलं की, नसबंदीची शस्त्रक्रिया करत असताना शंभर शस्त्रक्रियेपैकी एखादी शस्त्रक्रिया अयशस्वी होऊ शकते. संबंधित डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर कुटुंबातील तणाव निवळला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Rajasthan

    पुढील बातम्या