निघाली भलतीच वरात ! लग्नमंडपातच पत्नीनं केली पतीची धुलाई

मुलीच्या कुटुंबीयांना जेव्हा ही धक्कादायक बाब समजली तेव्हा त्यांनी नवऱ्या मुलाला डांबून ठेवलं.

  • Share this:

पत्नीनं भर मंडपातच आपल्या पतीची चांगलीच धुलाई केल्याची घटना समोर आली आहे. या दोघांमधील वाद पाहता वऱ्हाडी मंडळी फरार झाली.  विवाहित असतानाही दुसऱ्या लग्नाचा घाट घातला म्हणून पत्नीनं पतीची धुलाई करत वरात काढली. दुसऱ्या मुलीची कुटुंबीयांना जेव्हा ही धक्कादायक बाब समजली तेव्हा त्यांनी नवऱ्या मुलाला डांबून ठेवलं.

ही घटना आहे बिहारमधील. वैशालीहून मुझफ्फरपूर येथे स्वतःचं दुसरं लग्न रचण्यास जाणाऱ्या तरुणाची त्याच्या पहिल्या पत्नीनं चांगलीच धुलाई केली. रिंकी कुमारीनं पती अशोक कुमार पासवान सर्वांदेखत धुलाई केली. या दोघांच्या लग्नाला केवळ अडीच वर्ष झाली होती. शिवाय, तीन महिन्यांची गरोदर असल्याचंही रिंकीनं यावेळेस सांगितलं.

रिंकीनं सांगितलं की, बाहेरगावी नोकरी करण्याच्या बहाणा करून अशोकनं तिला माहेरी सोडलं. दोघंही मोबाइलवरून एकमेकांच्या संपर्कात होते. पण मधल्या काही दिवसांत अशोकनं रिंकीसोबत संपर्क केलाच नाही. यामुळे तिला चिंता वाटू लागली. तिनं आपल्या मामाला फोन केला. मामानं त्याचा शोध घेतला असता अशोक दुसरं लग्न थाटत असल्याची माहिती समोर आली. मामानं दिलेल्या माहितीनुसार रिंकीनं मुझफ्फरपूरमध्ये दाखल झाली. तेथे तिला समजलं की मुशहरीतील एका तरुणीसोबत अशोक लग्न करणार आहे.

 यानंतर रिंकी मालघाट येथील विवाहस्थळी पोहोचली, जेथे अशोकचं दुसऱ्या लग्नाचा सोहळा सुरू होता. मंडपात पोहोचताच रिंकीनं गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रिंकीने सर्वांदेखत पती अशोकची धुलाई केली. यामागील कारण समजल्यानंतर दुसऱ्या मुलीच्या कुटंबीयांनी अशोकला डांबून ठेवलं आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर वऱ्हाडी मंडळी फरार झाले.

दरम्यान, दुसऱ्या मुलीच्या कुटुंबीयांना नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांकडून लग्नाच्या खर्चाची रक्कम मागितली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 06:53 PM IST

ताज्या बातम्या