बायकोला दाढी आहे म्हणून मागितला घटस्फोट, काय म्हणालं कोर्ट?

बायकोला दाढी आहे म्हणून मागितला घटस्फोट, काय म्हणालं कोर्ट?

न्यायाधीश एनएम कारोवाडिया यांच्या समोर या व्यक्तीनं दावा केला की त्याचं लग्न फसवून केलं गेलंय. तिला दाढी आहे, आवाज पुरुषी आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 19 जून : अहमदाबादच्या न्यायालयानं एका माणसाची घटस्फोटाची याचिका रद्दबादल केलीय.त्यानं कोर्टाकडे घटस्फोट मागितला होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या बायकोला दाढी आहे आणि तिचा आवाज पुरुषांसारखा आहे.

न्यायाधीश एनएम कारोवाडिया यांच्या समोर या व्यक्तीनं दावा केला की त्याचं लग्न फसवून केलं गेलंय. तिला दाढी आहे, आवाज पुरुषी आहे. लग्नाआधी तिनं बुरखा घातला होता. त्यामुळे त्यानं तिचा चेहरा पाहिला नाही.

यावर पत्नीचं म्हणणं आहे की हाॅरमोन्समधल्या बदलांमुळे हे चेहऱ्यावर केस आलेत. त्यावर उपाय करता येईल. पण पतीला मला घराबाहेर काढायचंय. त्याची कारणं वेगळी आहेत.

अर्थात, न्यायालयानं हा घटस्फोटच नाकारला.

हेही वाचा

भयंकर! नागपूरमध्ये गुप्तधनासाठी केला बहीण आणि कुटुंबाचा खून

स्वबळाचा नारा दिलाय, आता शांत बसू नका- आदित्य ठाकरे

 

First published: June 19, 2018, 2:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading