अहमदाबाद, 26 ऑक्टोबर : नवरा-बायकोची (Husband wife) भांडणं (Husband wife disputes) तशी नवी नाहीत. त्यांच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या कारणावरूनही भांडण होतं (Husband wife disputes over social media). पण सध्या सोशल मीडियावरूनही दाम्पत्यांमध्ये भांडणं होताना दिसत आहेत. गुजरातमध्ये नुकतंच असं प्रकरण समोर आलं आहे, जिथं बायकोने आपल्या नवऱ्याच्या सोशल मीडिया पोस्टच्या लाइकवरून वाद घातला आणि मग नवऱ्याने बायकोला मारहाण केली.
वडोदरातील ही दाम्पत्य. दोघांचंही स्वतंत्र सोशल मीडिया अकाऊंट आहे. महिलेने आपल्या पतीचं सोशल मी़डिया उघडलं. तेव्हा तिने पाहिलं की तिच्या नवऱ्याने काही मिनिटांपूर्वी अपलोड केलेल्या पोस्टला बरेच लाइक आले. नवऱ्याच्या पोस्टवर आलेले इतके लाइक पाहून बायकोच्या रागाचा पारा चढला.
हे वाचा - मला तुरुंगात डांबा पण बायकोसोबत नका ठेवू, त्रस्त पतीची पोलिसांना कळकळीची विनंती
रिपोर्टनुसार महिलेने आपल्या पतीचा मोबाइल हिसकावून घेतला आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की तिच्या नवऱ्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली. महिलेने मदतीसाठी अभयम हेल्पलाइनवर फोन केला आणि आपला नवरा आपल्याला मारत असल्याची तक्रार तिने केली.
अभयम हेल्पलाइन काऊन्सलर दाम्पत्याच्या घरी गेले. त्यांनी या दोघांनाही समज दिली. त्या व्यक्तीला बायकोला पुन्हा मारहाण केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार असल्याचा इशारा दिला. तर महिलेला सोशल मीडियावर काहीही पाहून चुकूचा अर्थ लावू नये, असं सांगितलं.
हे वाचा - प्रेमभंग झाल्यावरही येतो हृदयविकाराचा झटका? संशोधनातून समोर आल्या या बाबी
याआधी पुण्यातही सोशल मीडियामुळ् असंच नवरा-बायकोत भांडण झालं होतं. नवरा आपला फोटो डीपीवर ठेवत नाही म्हणू बायको भांडू लागली. या दोघांचं भांडण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. कौटुंबिक तंटे सोडवण्यासाठी पुणे पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये समुपदेशन केलं जाते. घरगुती भांडण कायद्याच्या कक्षेत येण्यापूर्वीच समंजसपणे सोडवण्याचं काम भरोसा सेलमध्ये केलं जातं. तिथंच या दाम्पत्याचा वाद मिटला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat, Relationship, Social media, Wife and husband