धक्कादायक- पत्नीचा खून करुन मृतदेह फ्रीजमध्ये, तर तीन वर्षांच्या मुलीला खोक्यात डांबून मारले

धक्कादायक- पत्नीचा खून करुन मृतदेह फ्रीजमध्ये, तर तीन वर्षांच्या मुलीला खोक्यात डांबून मारले

आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह बेडवर होता तर पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह कपाटात मिळाला

  • Share this:

उत्तर प्रदेश, २१ ऑगस्ट- अलाहाबादमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पीपल गांव परिसरात मनोज नावाच्या व्यक्तीने पत्नी आणि तीन मुलींची हत्या करुन नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. मनोज शेतकरी होता. शनिवारी संध्याकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा प्रयत्न करुनही उघडत नसल्यामुळे घरातील सदस्यांनी घाबरून पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला, तेव्हा त्यांना आत संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह सापडले. आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह बेडवर होता तर पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह कपाटात मिळाला. तर तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह एका खोक्यात मिळाला. मनोजने पत्नीचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता.

मनोजने पत्नी आणि मुलींची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्या असे का म्हटले याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच मनोजने नेमकी असे का केले याबद्दल घरातल्यांनाही फारसे काही माहीत नाही असे घरातील सदस्यांकडून सांगण्यात आले. मात्र शेजारी राहणाऱ्याकडून, कौटुंबिक वादामुळे मनोजने आपल्या पत्नी आणि मुलींची हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. मनोज आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमीच वाद व्हायचा. सोमवारी दुपारीही त्यांच्यामध्ये वाद झाला. मात्र त्यांच्यात वाद झालाच नाही असे मनोजच्या घरातल्यांचे म्हणणे आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून लवकराच लवकर या मागील कारण समोर येईल असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

VIDEO : गळ्यात साप घेऊन सेल्फी काढतायत या मुली!

हेही वाचा-

Live Blog: चीनचे संरक्षण मंत्री आज भारत दौऱ्यावर

VIDEO : पाण्याची टाकी पाडणे बेतले जीवावर,'पोकलेन'वर कोसळली टाकी

येत्या 48 तासात विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2018 09:23 AM IST

ताज्या बातम्या