'मी वडील राजीव गांधी यांच्यासोबत INS विराटवर गेलो होतो'; राहुल गांधी यांची कबुली

'मी वडील राजीव गांधी यांच्यासोबत INS विराटवर गेलो होतो'; राहुल गांधी यांची कबुली

INS विराटच्या वादावर राहुल गांधी यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : 'काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नामदार परिवाराने देशाची आन बाण आणि शान असलेल्या INS विराटचा टॅक्सीप्रमाणे वापर केला होता. राजीव गांधी पंतप्रधान असताना 10 दिवसांच्या सुट्टीवर होते. तेव्हा INS विराटचा वापर केल्याचा आरोप नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भाषणादरम्यान केला होता.' त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पहिल्यांदा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'INS विराटचा वापर कुणीही सुट्टीसाठी का करेल? ती क्रुझशिप नाही.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच थेट उत्तर दिलं आहे. मागील काही दिवसांपासून राजीव गांधी आणि INS विराट यावरून आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. त्याबाबत दावे – प्रतिदावे देखील केले जात आहेत. शिवाय, 'सैन्य दल हे कुणाचेही खासगी सैन्य नसल्याचं' राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

'मी वडील राजीव गांधी यांच्यासोबत INS विराटवर गेलो होतो. पण, सुट्टीसाठी नाही. माझे वडील पंतप्रधान असताना आम्ही INS विराटवर गेलो. पण ती एक ऑफिशियल भेट होती' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

30 वर्षांनी लहान महिला को- पायलटचं ऐकलं नाही म्हणून झाला एअर इंडियाचा 'तो' अपघात

काय म्हणाले निवृत्त अधिकारी

दरम्यान, निवृत्त निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल विनोद पसरिया यांनी राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नीची ट्रिप पूर्णता ऑफिशिअल होती. ही ट्रिप दोन दिवसांची होती. यामध्ये सर्व नियम पाळण्यात आले होते. कुणीही सुट्टीवर नव्हतं. यापूर्वी देखील काही पंतप्रधान INS विराटवरती आले आहेत. नरेंद्र मोदींचा दावा चुकीचा आहे. यावेळी राहुल गांधी राजीव गांधी यांच्यासोबत होते. कुणीही विदेशी पाहुणा यावेळी नसल्याचं म्हटलं होतं.

VIDEO : शीख दंगलींच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसवर केले गंभीर आरोप

First published: May 10, 2019, 6:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading