जरा हटके...चीनमधल्या आजी-आजोबांना 'साठी'नंतर नाचायचं आणि शिकायचं!

जरा हटके...चीनमधल्या आजी-आजोबांना 'साठी'नंतर नाचायचं आणि शिकायचं!

एकटेपण घालवण्यासाठी चीनमध्ये 60नंतरच्या नागरिकांना शिकायचं आहे.

  • Share this:

बिजिंग 21 मार्च : चीनचे सर्वच काम हे भव्य दिव्य असतं. अनेक मोठ मोठे प्रकल्प उभारून चीनने जगात अनेक विक्रम केले आहेत. आता मनुष्यबळाचं नियोजन करण्यासाठी चीनने 60 वर्षांवरच्या नागरिकांना विविश स्किल्स शिकविण्याची मोहिमच उघडलीय. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व देशभर खास कॉलेजेसही चीन सरकारने उघडले आहेत.

आर्थिक सुधारणांमुळे सर्व जगातून भांडवल चीनमध्ये आलं. स्वस्त मनुष्यबळ असल्याने जगभरातले उद्योग चीनमध्ये आले. प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला. आता देशातल्या ज्येष्ठ नागरिकांनाही विविध कौशल्य शिकविण्यासाठी चीनने अनेक उपक्रम हाती घेतलेय.

ज्येष्ठ नागरिकांसाठी संपूर्ण चीनमध्ये 70 हजार कॉलेजेस उघडण्यात असून त्याच 80 लाखांपेक्षा जास्त जणांनी प्रवेश  घेतला आहे. English Speaking, डान्सिंग,चित्रकला, संगीत अशा अनेक गोष्टी या कॉलेजेसमध्ये शिकविण्यात येत आहेत. चीनमध्ये English भाषा बोलणं आणि लिहिणाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे जगभरातून इंग्रजींच्या शिक्षकांना तिथे मागणी असते. त्यामुळे देशातच असे शिक्षक तयार करण्याचं चीनने ठरवलंय.

वन चाईल्ड धोरणामुळे प्रत्येक कुटुंबात एकच मुलगा किंवा मुलगी असते. ते शिकायला बाहेर गेल्यावर पालकांना एकट वाटतं. ते एकटेपण आणि नैराश्य घालविण्यासाठी या उपक्रमामुळे फायदा होईल असं तिथल्या सरकारला वाटत आहे. त्याचबरोबर इंटरनेटचा उत्तम प्रकारे कसा वापर करायचा याचं शिक्षणही या ज्येष्ठांना देण्यात येत आहे.  त्यामुळे अनेक पेंशनधारकांना नवीन कौशल्य शिकायला मिळतंय तर अनेक कुटुंबांना चार पैसेही मिळत आहेत.

First published: March 21, 2019, 6:35 PM IST
Tags: china

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading