उद्धव ठाकरे का करत आहेत वारंवार अयोध्या दौरा?

उद्धव ठाकरे का करत आहेत वारंवार अयोध्या दौरा?

Ram Mandir : उद्धव ठाकरे यांनी मागील 8 महिन्यांमध्ये दोन वेळा अयोध्येचा दौरा केला आहे.

  • Share this:

अयोध्या, अनिल राय, 17 जून : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील 8 महिन्यांमध्ये 2 वेळा अयोध्या दौरा केला आहे. 2 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी लोकसभा निवडणुकीची चर्चा जोरात होती. निवडणुकीदरम्यान शिवसेना – भाजपमध्ये राजकीय संबंध देखील ताणले गेले होते. पण, लोकसभा निवडणुकीमध्ये युती केल्यानंतर शिवसेना – भाजपला राज्यात मोठं यश मिळालं. त्यानंतर देखील उद्धव ठाकरे अयोध्या दौरा का करतात? प्रश्न नक्कीच आहे. राजकीय दृष्ट्या विचार करता शिवसेना सध्या हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करत आहे. त्यामुळे राजकारणात अयोध्येच्या मुद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

राम मंदिराच्या मुद्याला दुर्लक्ष करून चालणार नाही

उद्धव ठाकरे सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे राजकारण करत आहेत. धर्म राजकारणापासून वेगळा होऊ शकतो, पण, धर्माशिवाय राजकारण होऊ शकत नाही. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा जुना असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

सरकारी बँकांना 30 हजार कोटी मिळावेत म्हणून मोदी सरकारचा 'हा' प्लॅन

राज्यात देखील अयोध्या मुद्याचा प्रभाव

राम मंदिराचा मुद्दा हा उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील महत्त्वाचा आहे. एक म्हणजे महाराष्ट्राच्या काही शहरांमध्ये उत्तर प्रदेशातील लोकांची संख्या ही लक्षणीय आहे. शिवाय, 1992मध्ये बाबरी मस्जिद पाडल्यानंतर सर्वात जास्त हिंसाचार हा मुंबईमध्ये झाला होता. त्यामुळे राज्यात अयोध्येचा मुद्दा महत्त्वाचा आहे. राज्यात आम्हीच मोठा भाऊ म्हणणारी शिवसेना आता हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करताना दिसत आहे. पण, सध्या आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाचा विचार करता भाजपच्या तुलनेत शिवसेनेचं संख्याबळ कमी आहे.

Monsoon Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी गायब

विधानसभा निवडणुका

2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढल्या होत्या. त्यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा जिंकता आल्या होत्या. 2019मध्ये लोकसभा निवडणुकीकरता दोन्ही पक्षांनी युती केली असली तरी दोघांमध्ये जागा वाटपावरून वाद आहेत. त्यामुळे शिवसेनेनं आपले मोहरे देखील पुढे करायला सुरूवात केली आहे.

दबावाची रणनीती

राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेना – भाजपवर दबाव टाकू इच्छिते. कारण, लोकसभेच्या निकालानंतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप जास्त जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. केंद्रात देखील शिवसेनेला पूर्वीचंच एक मंत्रिपद देण्यात आलं. त्यामुळे विधानसभेकरता जागा वाटप करताना शिवसेना दबाव कायम ठेवू इच्छिते.

VIDEO: झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला टोळीकडून बेदम मारहाण

First published: June 17, 2019, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading