गुप्त सूचना मिळूनही आपण का रोखू शकत नाही दहशतवादी हल्ले?

गुप्त सूचना मिळूनही आपण का रोखू शकत नाही दहशतवादी हल्ले?

सगळ्या संस्थांच्या सूचना एकत्र करुन जो समन्वय साधयाला पाहिजे तो साधला जात नाही. या चूका होत असल्यानेच दहशतवादी घटना घडतात.

  • Share this:

नवी दिल्ली 15 फेब्रुवारी : पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा गुप्तचर संस्थांच्या कामकाजाविषयी शंका उपस्थित केली जातेय. गुप्तचर संस्थांनी अशा हल्ल्याविषयी सूचना दिली होती असं सांगितलं जातं मात्र त्यानंतरही असे हल्ले होतच राहतात. त्यामुळे या संस्थांनच्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल करायला पाहिजे असं मत व्यक्त होत आहे.

गुप्त सूचना मिळूनही अशा घटना वारंवार का होतात असा प्रश्न विचारला जातो. देशात बहुस्तरीय गुप्तचर यंत्रणा काम करतात. मात्र त्या सूचना एकत्र करून त्याचं विश्लेषण करणं आणि योग्य अर्थ काढणं हे काम योग्य पद्धतीने होत नसल्याचं सुरक्षा तज्ज्ञांचं मत आहे.

चार गुप्तचर संस्था महत्त्वाच्या

देशात चार गुप्तचर संस्था महत्त्वाच्या आहेत. यात RAW, IB, लष्करी गुप्तचर संस्था आणि स्थानिक पोलिसांचा गुप्तचर विभाग ही माहिती गोळा करत असते. त्यानंतर त्या सूचना संबंधित विभागाकडे पाठवल्या जातात. नंतर त्याची विभागणीकरून त्या गृहमंत्रालयाला आणि नंतर पंतप्रधान कार्यालयाला त्या सूचना पाठवल्या जातात. त्यानंतर त्याची छाननी होऊन गृहमंत्रालय संबंधीत राज्यांच्या पोलीस प्रमुखांना ती माहिती पाठवतात.

RAW

Research and Analysis Wing ही भारताची सर्वात महत्त्वाची गुप्तचर संस्था आहे. 'रॉ'कडे विदेशातली माहिती मोळा करण्याचं काम असते. भारताविषयी संबंधीत असलेल्या आणि जगभरात घडणाऱ्या मुख्य घटनांविषयी माहिती जमा करणं त्याचं विश्लेषण करणं हे काम 'रॉ' करतं.

IB

Intelligence Bureau ही देशांतर्गत काम करणारी सर्वात महत्त्वाची गुप्तचर संस्था आहे. देशांतर्गत असलेला धोका, दहशतवादी संघटना, असामाजिक तत्व, संघटीत गुन्हेगारी याची माहिती गोळा करत असते. विविध संस्थांशी समन्वय साधत आयबी माहिती गोळा करते आणि संबंधीत सर्व संस्थांना सतर्क करते.

लष्करी गुप्तचर संस्था

भूदल, हवाईदल आणि नौदलात गुप्तचर विभाग असतो. याचं काम मर्यादीत असते. आपापल्या कार्यक्षेत्रातल्या घडामोडींवर नजर ठेवणं, शत्रू राष्ट्रांच्या हालचालींवर सीमेवर नजर ठेवणं. सीमेवरच्या कारवायाची माहिती गोळा करणं. शत्रू राष्ट्राच्या लष्करी सामर्थ्याविषयी, त्यांच्या नव्या योजनांविषयी ताजी माहिती गोळा करण्याचं काम या संस्था करत असतात.

मग चूक नेमकी होते कुठे?

या संस्था माहिती गोळा करुन पाठवीत असल्या तरी त्यांच्यात जो व्यावसायिकपणा पाहिजे तो नाही असा आक्षेप घेतला जातो. या संस्था ज्या सूचना देतात त्यांच्यात नेमकेपणा नसतो. माहिती त्रोटक असते त्यामुळे त्याचा छडा लावणे कठीण जातं. त्याचबरोबर विविध संस्था या दररोज धोक्यांविषयी सूचना देत असतात. त्यामुळे अनेकदा या गोष्टी या फक्त उपचार म्हणून घेतल्या जातात.

या सूचनांवर जी तत्परता दाखवायला पाहिजी ती दाखवली जात नाही असं मत उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंह या सगळ्या संस्थांच्या सूचना एकत्र करुन जो समन्वय साधयाला पाहिजे तो साधला जात नाही असंही सिंह यांनी सांगितलं. या चूका होत असल्यानेच दहशतवादी घटना घडतात असंही ते म्हणाले.

VIDEO : ‘बाबा येतो मी…’ शहीद पनमाजचं बाबांसाठी शेवटचं वाक्य

First published: February 15, 2019, 3:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading