मराठी बातम्या /बातम्या /देश /

AIR STRIKE : पुलवामा हल्ल्यावरुन एचडी कुमारस्वामींचा मोदी सरकारवर आरोप

AIR STRIKE : पुलवामा हल्ल्यावरुन एचडी कुमारस्वामींचा मोदी सरकारवर आरोप

एअर स्ट्राईकवरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी भाजप नेत्यांवर केले आरोप

एअर स्ट्राईकवरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी भाजप नेत्यांवर केले आरोप

एअर स्ट्राईकवरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी भाजप नेत्यांवर केले आरोप

म्हैसूर, 03 मार्च : कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी शुक्रवारी म्हैसुर येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, आताच दहशतवादी हल्ले का होत आहेत. त्यांचे वडील एचडी देवगोंडा पंतप्रधान असताना असे प्रकार झाले नाहीत. यावर विचार करायला हवा असंही ते म्हणाले.

कुमारस्वामी म्हणाले की, काश्मीरमध्ये जाण्यासाठी पंतप्रधानांना कडक सुरक्षेची आवश्यतता असते. पण देवगौडा असे पंतप्रधान होते ज्यांनी ओपन जीपमधून काश्मीरमध्ये प्रवास केला ही गोष्ट विसरुन चालणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणााले की, माहिती नाही हे कधी आणि कुठं जाऊन थांबणार आहे.

एअर स्ट्राईकच्या होत असलेल्या राजकारणावरुन कुमारस्वामींनी भाजपवर टीका करताना म्हटलं की, दोन गटात तणावाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वत: सीमेवर जाऊन एअर स्ट्राईक केल्यासारखं त्यांचं वागणं असून हे लोक वैयक्तिक फायद्यासाठी असं करत आहेत. तसेच पक्षाचे कार्यकर्ते असं वागत आहेत जसं की देशाची काळजी फक्त यांनाच आहे.

भाजपने कुमारस्वामींच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यावरही कुमारस्वामींनी प्रत्यारोप करत भाजपने आपले भाषण एडिट केल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भाषण रिलीज केलं. मी म्हणालो होतो की, भाजप नेते असे वागत आहेत जसं सैनिकांनी नाही तर त्यांनी स्वत: सीमेवर जाऊन लढले आहेत.

VIDEO पंकजा मुंडेंनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाल्या पवारसाहेब 'या' अभिनेत्यासारखे

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-347002" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzQ3MDAy/"></iframe>

First published:

Tags: H D Deve Gowda, HD Kumarswamy, Karnataka, Terrorism