डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेजवानीला सोनियांना निमंत्रण नाही, हे आहे कारण

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेजवानीला सोनियांना निमंत्रण नाही, हे आहे कारण

'युपीएच्या काळात ज्या राष्ट्राध्यक्षांना राष्ट्रपतींनी मेजवानी दिली होती त्यासाठी भाजपच्या अध्यक्षांना किंवा कुठल्याही बड्या नेत्याला बोलावण्यात आलं नव्हतं.'

  • Share this:

नवी दिल्ली 25 फेब्रुवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मेजवानीचं आयोजन केलंय. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या मेजवानीसाठी देशभरातल्या गणमान्य 100 लोकांना निमंत्रित करण्यात आलंय. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसने या मेजवानीवर बहिष्कार घातलाय. सरकारकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, विरोधीपक्ष नेते अधीररंजन चौधरी, गुलामनबी आझाद यांनी निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र सोनियांना निमंत्रण न दिल्याने काँग्रेसने या मेजवानीवर बहिष्कार टाकलाय.

या हायप्रोफाईल मेजवानीसाठी मोजक्या 100 मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलंय. सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा असल्याने त्यांना बोलवायला पाहिजे होतं असं काँग्रेसने म्हटलं आहे. मात्र युपीएच्या काळात ज्या राष्ट्राध्यक्षांना राष्ट्रपतींनी मेजवानी दिली होती त्यासाठी भाजपच्या अध्यक्षांना किंवा कुठल्याही बड्या नेत्याला बोलावण्यात आलं नव्हतं असा युक्तिवाद सरकारकडून केला जातोय.

LIVE Updates: ट्रम्प यांच्या भेटीचा दुसरा दिवस, 3 अब्ज डॉलर्सचा करार होणार

अशा कार्यक्रमांना विरोधीपक्षांच्या अध्यक्षांना बोलाविण्याची कुठलहीही परंपरा नाही असंही सरकारकडून सांगण्यात येतंय. या मेजवानीसाठी खास तयारी करण्यात आली आहे. शाकाराही आणि मांसाहारी मेन्यू ठरविण्यात आला असून भारतातल्या अनेक राज्यांचे स्वादीष्ट पदार्थ या मेजवानीत असणार आहेत.

हेही वाचा...

दिल्ली हिंसाचारात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक

मेलानिया ट्रम्प यांची ताजमहाल भेट आणि पांढऱ्या जंपसूटचं भारतीय कनेक्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 10:14 AM IST

ताज्या बातम्या