अशा कोणत्या कारणामुळे सोनिया गांधी राजकारण सोडू शकल्या नाहीत ?

अशा कोणत्या कारणामुळे सोनिया गांधी राजकारण सोडू शकल्या नाहीत ?

सोनिया गांधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची तयारी करतायत.कारण राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या तुलनेत सोनिया गांधींची राजकीय समज चांगलीच सखोल आहे.

  • Share this:

रशीद किडवई

नवी दिल्ली, 9 मार्च : सोनिया गांधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची तयारी करतायत.कारण राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या तुलनेत सोनिया गांधींची राजकीय समज चांगलीच सखोल आहे.

सोनिया गांधींच्या रायबरेलीहून निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय. याआधी त्यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी तर सोनियांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेणंही बंद केलं होतं. कुणी भेटीची वेळ मागितली तर 'तुमच्याशी राहुल बोलतील', असं त्या सांगायच्या. पण भारताच्या हवाई हल्ल्यानंतर देशातली परिस्थिती झपाट्याने बदलली. त्यामुळेच सोनिया गांधींना 'किंगमेकर' च्या भूमिकेत मैदानात उतरावंसं वाटलं.

सोनियांमध्ये एनडीएच्या विरोधकांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता आहे. 2004 मध्ये काँग्रेसने डीएमके ला सोबत घेतलं होतं त्यात सोनियांचा मोठा वाटा होता. डीएमकेचं एलटीटीई च्या बाबतीत नेहमीच मवाळ धोरण होतं. तरीही सोनियांनी त्यांचा समावेश यूपीए मध्ये केला. राष्ट्रवादीचे नते शरद पवार यांनी त्यांच्या परकीय वंशाचा मुद्दा काढला तरीही त्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन चालल्या.

इच्छेविरुद्ध राजकारणात

सोनिया गांधींची इच्छा असो किंवा नसो, त्यांना या ना त्या कारणामुळे राजकीय आखाड्यात उतरावंच लागतं.

राजीव गांधींनी राजकारणात येऊ नये, असं सोनियांना वाटत होतं. पण इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधींना राजकारणात यावंच लागलं.

राजीव गांधींच्या हत्येनंतर प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कमिटीने त्यांना वारंवार राजकारणात येण्याची विनंती केली. पण त्यांनी नकारच दिला.

उत्तर प्रदेशमधल्या या लोकसभा जागेतून लढू शकतात ओवेसी, MIM च्या बैठकीत फैसला

1997 मध्ये असलम शेर खान, मणिशंकर अय्यर, पीआर कुमार मंगलम, सुरेश कलमाडी आणि बुटासिंग हे काँग्रेसमधून बाहेर गेल्यानंतर दिग्विजय सिंह, अहमद पटेल, अशोक गेहलोत, वायलर रवी आणि कमलनाथ या ब्रिगेडने सोनिया गांधींना राजकारणात येण्याची गळ घातली. त्याचवेळी राजीव गांधींच्या हत्येच्या चौकशीत होणारा उशीर आणि नेहरु गांधी परिवारावर होणारी टीका यामुळे सोनिया गांधींना अखेर राजकारणात यावंच लागलं.

राजकारणात आल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या होत्या, 'खोट्या गोष्टी आणि टिकेवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा ते सहन करायला मला शिकावं लागेल. भारतात लोकशाही आहे आणि म्हणूनच चर्चा आणि संवादाला महत्त्व आहे.'

=================================================================================

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या ग्रँड सोहळ्याला सेलिब्रिटींची गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 06:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading