मराठी बातम्या /बातम्या /देश /

ट्रेनने जाताना स्टेशनवर समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते? जाणून घ्या कारण

ट्रेनने जाताना स्टेशनवर समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते? जाणून घ्या कारण

रेल्वे स्टेशनवरील बोर्डवर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. सामान्य प्रवाशांसाठी याचा तसा फायदा नसतो. पण हे संकेत ट्रेन चालक आणि गार्डसाठी अतिशय महत्त्वाचे असतात.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : भारतीय रेल्वे (Indian Railway) नेटवर्कची गणना जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये (Railway Network) केली जाते. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी चौकशी केंद्रांपासून स्टेशन मास्तर कार्यालयही असतं. रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे हेल्पलाइन नंबर 139 वरही माहिती घेण्यासाठी सुविधा मिळते. त्याशिवाय प्रत्येक रेल्वे स्टेशनवर त्या शहराच्या ओळखीशी संबंधित बोर्डही लावलेला असतो.

पिवळ्या रंगाच्या या बोर्डवर हिंदी आणि इंग्रजी भाषेशिवाय तेथील स्थानिक भाषेत स्टेशनचं नाव लिहिलेलं असतं. बोर्डवर लिहिलेल्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या खालच्या बाजूला स्टेशनपासून समुद्रसपाटीपासूनची उंची देखील नमूद केलेली असते. प्रत्येक वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर ही उंची वेगवेगळी असते. याला MSL (Mean Sea Level) म्हणतात. पण याचा अर्थ माहितेय का? ट्रेनने जायचं असतानाही, स्टेशनवरील पिवळ्या बोर्डवर समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते?

EXPLAINER : एका वर्षात भारतात येणार Flexi Fuel गाड्या, इंधनाचे दर घसरणार!

देशभरातील जवळपास सर्वच रेल्वे स्टेशनवरील बोर्डवर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. सामान्य प्रवाशांसाठी याचा तसा फायदा नसतो. पण हे संकेत ट्रेन चालक आणि गार्डसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. त्या स्टेशनवरुन जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठीचा, त्यांच्या सुरक्षेसाठीचा हा संकेत आहे.

Explainer : भारताला भोगावे लागणार तापमानवाढीचे दुष्परिणाम, या गोष्टी कारणीभूत

MSL-Mean Sea Level चा अर्थ काय?

कोणत्याही रेल्वे स्टेशनवर समुद्रसपाटीपासूनच्या उंचीची माहिती गार्ड आणि ड्रायव्हरच्या मदतीसाठी दिलेली असते. ट्रेनच्या ड्रायव्हरला याची माहिती असणं गरजेचं आहे, की जर ट्रेन उंचीच्या दिशेन जात असेल, तर ट्रेनचा स्पीड किती ठेवावा. तसंच गाडीच्या इंजिनला किती पॉवर सप्लाय द्यावा, ज्यामुळे ट्रेन सहजपणे उंचीच्या दिशेने पुढे जाईल. जर ट्रेन समुद्रसपाटीपासूनच्या खालच्या दिशेन जात असेल, तर ड्रायव्हरने ट्रेनचा स्पीड किती ठेवावा यासाठीच सर्व स्टेशनवर, त्या स्टेशनच्या नावाच्या पिवळ्या बोर्डवर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते.

First published:

Tags: Indian railway