'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'?

'हिंदुत्वा'वरून दोन मित्रांमध्ये का सुरू आहे 'महाभारत'?

'आधी मंदिर मग सरकार' अशी घोषणाही शिवसेनेने दिली आहे. तुम्हाला मंदिर बांधणं होत नसेल तर सांगा आम्ही बांधू असं थेट आव्हानच उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं.

  • Share this:

मुंबई, ता. 21 नोव्हेंबर : हिंदुत्व हा शिवेसना आणि भाजपला जोडून ठेवणारा धागा. याच धाग्यानं त्यांना 25 वर्षं युतीत बांधून ठेवलं. 2014 मध्ये तुटलेल्या युतीनं दोन्ही पक्षांमधल्या मतभेदांची दरी इतकी वाढलीय की दोघांना जोडणाऱ्या हिंदुत्वावरूनच आता या मित्रपक्षांमध्ये महाभारत घडतंय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय महाभारताला सुरुवात झालीय. राम मंदिर हा विषय भाजपच्या अजेंड्यावर कायम स्वरूपी असतो. 2014 मध्ये भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळालं. केंद्रात सत्ता आली. मात्र राम मंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीसाठी आला असल्याने त्यावर सत्ताधारी असल्यानं भाजपला उघडपणे काही बोलता येत नाही.

राम मंदिराचा मुद्दा हा कोर्टाच्या किंवा परस्पर चर्चेतून सोडवावा असे दोन पर्याय आहे. सरकारने अध्यादेश काढून राममंदिराचा प्रश्न मार्गी लावावा असं कडव्या हिंदुत्ववाद्यांना वाटतंय. पण अध्यादेश काढणं हा प्रश्न सोडविण्याचा उत्तम पर्याय नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. तर परस्पर चर्चेने हा प्रश्न सुटू शकत नाही असं स्पष्ट झालंय. त्यामुळं कोर्टाच्या निकालाची प्रतिक्षा करण्यावाचून दुसरा उपाय नाही असं एका मोठ्या वर्गाला वाटतं.

केंद्र सरकारची आता साडेचार वर्षपूर्ण होताहेत. शिवसेनेलाही निवडणुका खुणावू लागल्यानं त्यांचा भाजपला कोडींत पकडण्याचा प्रयत्न आहे. 'आधी मंदिर मग सरकार' अशी घोषणाही शिवसेनेने दिली आहे. तुम्हाला मंदिर बांधणं होत नसेल तर सांगा आम्ही बांधू असं थेट आव्हानच उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं.

याच राजकारणातून शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे हे अयोध्येत जावून लक्षवेधण्याचा आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करताहेत असंही बोललं जातंय. तर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची दखल न घेता त्याकडे दुलर्क्ष करण्याची भाजपची व्युव्हरचना आहे. या दौऱ्यातली हवा काढण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत 25 नोव्हेंबरलाच हुंकार रॅली आणि धर्म सभेचं आयोजन केलंय. त्यामुळं तीन दशकं एकत्र राहिलेले मित्र ज्या मद्यावरून एकत्र राहिले त्याच मुद्यावर थेट अयोध्येतच आमने-सामने येणार आहे.

VIDEO : 'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर!

First published: November 21, 2018, 10:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading