मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान मोदींना सहकाऱ्यांचा विसर? गडकरींपाठोपाठ योगींनाही दिल्या नाही वाढदिवसाच्या जाहीर शुभेच्छा...!

पंतप्रधान मोदींना सहकाऱ्यांचा विसर? गडकरींपाठोपाठ योगींनाही दिल्या नाही वाढदिवसाच्या जाहीर शुभेच्छा...!

सोशल मीडियावर नेहमी अतिशय सक्रिय, कट्टर विरोधकांचेही अभिनंदन करणारे नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवरून कोणत्याही पक्षाचे नेते, मंत्रिमंडळातील सहकारी किंवा कोणत्याही व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 06 जून : लखनऊ आणि दिल्लीतील राजकारणादरम्यान सर्व काही ठीक तरी आहे ना? असा प्रश्न उपस्थित झालाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या या फायरब्रँड नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. इतकेच नाही तर गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही ट्विट करून योगी आदित्यनाथ यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. यावरून राजकीय घमासान चालू आहे. वाढदिवसांच्या शुभेच्छांवरून चर्चा होण्यापाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटर खातं कारणीभूत आहे. सोशल मीडियावर नेहमी अतिशय सक्रिय, कट्टर विरोधकांचेही अभिनंदन करणारे नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या ट्विटर हँडलवरून कोणत्याही पक्षाचे नेते, मंत्रिमंडळातील सहकारी, विरोधी पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत. अमित शाहांच्या ट्विटर हँडलचीही तीच स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ट्विटर हँडलवरून कोणालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश देण्यात आलेले नाहीत. 27 मे रोजी नितीन गडकरी (Nitin Gadkari)  यांचा वाढदिवस होता, मात्र त्यांनाही शुभेच्छा देण्यात आलेल्या नाहीत. त्याशिवाय 18 मे रोजी थावरचंद गेहलोत यांचा वाढदिवस होता. 24 मे रोजी केरळच्या मुख्यमंत्र्यांचा, 3 मे रोजी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि 5 मे रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा वाढदिवस होता. मात्र, यातील कोणालाही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, बसपा अध्यक्ष मायावती, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगींना फोन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, असं यूपी सरकारच्या माहिती विभागानं म्हटलं आहे. इतकेच नाही तर बाबा रामदेव, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह, गजेंद्रसिंग शेखावत यांच्यासह अनेक राज्यांच्या राज्यपालांनीही योगी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सरकारच्या माहिती विभागाच्या माहितीनुसार वाराणसी, अयोध्या, मथुरा, प्रयागराज आणि गोरखपूर येथील साधु-संतांनीही योगी यांना वाढदिवसानिमित्ताने आशीर्वाद दिले. हे वाचा -ममता बॅनर्जींना हरवणाऱ्या भाजपा नेत्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल योगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्या गेल्यानं उत्तर प्रदेशमध्ये नेतृत्व बदल होत आहे का? अशीही काहींनी शंका व्यक्त केली. मात्र, भाजप सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असं काहीही नसून अलिकडे कोरोना महामारीमुळे कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना स्थिती बिकट असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नसावेत, असे सांगितले जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Narendra modi, Nitin gadkari, Yogi Aadityanath

  पुढील बातम्या