चीनला पाठिंबा देणाऱ्या काश्मिरींना ओमर अब्दुल्लांनी का दिला Google करण्याचा सल्ला?

चीनला पाठिंबा देणाऱ्या काश्मिरींना ओमर अब्दुल्लांनी का दिला Google करण्याचा सल्ला?

'ज्यांना चीन जवळचा वाटतो त्यांनी थोडं Google वर Uighur सर्च करून पाहा.'

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून : भारत-चीन सीमेवर तणाव वाढला आहे. पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात चीनची घुसखोरी परतवून लावताना भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर देशभर चीन विरोधी वातावरण तापलं आहे. पण दुसरीकडे काश्मीर खोऱ्यात मात्र भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांना मात्र चीनमुळे भारताची डोकेदुखी वाढल्याबद्दल समाधान वाटत आहे.

चीनकडे आपल्याला वाचवणारा देश किंवा भारताला धडा शिकवणारा देश म्हणून पाहणाऱ्या काश्मिरींना माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी मात्र चांगलंच सुनावलं. चीनला पाठिंबा देण्यापूर्वी जरा Google करून बघा, असा सल्ला अब्दुल्ला यांनी काश्मिरींना दिला आहे.

चीनमध्ये उइगर मुस्लिमांचे कसे हाल होतात, याची आठवण अब्दुल्ला यांनी करून दिली आहे. 'ज्यांना चीन जवळचा वाटतो त्यांनी थोडं Google वर Uighur Muslims असं सर्च करून पाहावं आणि मग ठरवावं तुम्ही कशाला निमंत्रण देत आहात', असं ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी लडाखमध्ये शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देणारं ट्वीटही केलं आहे. भारतीय लष्करासाठी मंगळवारचा दिवस सगळ्यात कठीण होता. शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी भावना व्यक्त केल्या. गेल्या जूनपासून नजरकैदेत असणाऱ्या अब्दुल्ला कुटुंबीयांची नुकतीच मार्चमध्ये सुटका झाली आहे. कलम 370 हटवल्यानंतर आणि लडाख प्रांत जम्मू काश्मीर राज्यापासून वेगळा केल्यानंतर ओमर अब्दुल्ला गृहकैदेत होते.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार, किमान दहा लाख मुस्लिमांना चीनच्या शिनझियांग प्रांतातल्या छावण्यांमध्ये डांबून ठेवलं आहे. या छावण्यांमध्ये त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत असल्याचा चीनचा दावा असला, तरी प्रत्यक्षात त्या या धार्मिक अल्पसंख्याकांच्या छळछावण्या आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच उइगर मुस्लिमांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने एका विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार होत आहेत. अल्पसंख्याकविरोधी कारवाईत सहभागी होणाऱ्यांना चिन्यांवर या विधेयकामुळे वचक बसेल अशी आशा आहे. या विधेयकामुळे चीनवरचा दबाव वाढला आहे.

हेही वाचाः

ट्रम्प यांनी चीनला दिला दणका; अडचणीत आणणाऱ्या विधेयकावर केली स्वाक्षरी

TikTok सह 52 चिनी अ‍ॅप बंद करा, गुप्तचर संस्थेची केंद्र सरकारला शिफारस

First published: June 18, 2020, 4:48 PM IST

ताज्या बातम्या