Home /News /national /

Nupur Sharma: नुपूर शर्मांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या खऱ्या नावाने याचिका का दाखल केली नाही?

Nupur Sharma: नुपूर शर्मांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या खऱ्या नावाने याचिका का दाखल केली नाही?

दुहेरी खंडपीठाच्या सुनावणीचं नेतृत्व करत असलेल्या न्यायाधीश सूर्यकांत यांनी एनव्ही शर्मा नावाने दाखल केलेल्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले की, नुपूर शर्मा यांनी आपल्या खऱ्या नावाने याचिका का दाखल केली नाही?

    नवी दिल्ली 02 जुलै : प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाष्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या खऱ्या नावाने याचिका दाखल करण्याऐवजी एनवी शर्मा नावाने याचिका दाखल केली होती (Nupur Sharma Case). कोर्टात नुपूर शर्माच्या वकिलांना युक्तिवाद सुरू करण्याची संधी मिळण्याआधीच दुहेरी खंडपीठाच्या सुनावणीचं नेतृत्व करत असलेल्या न्यायाधीश सूर्यकांत यांनी एनव्ही शर्मा नावाने दाखल केलेल्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले की, नुपूर शर्मा यांनी आपल्या खऱ्या नावाने याचिका का दाखल केली नाही? नुपूर शर्माने आपल्या विरोधात दाखल झालेले वेगवेगळे खटले एकाच ठिकाणी हस्तांतरित करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जेबी पारदीवाला यांच्या खंडपीठाने कठोर टिप्पणी केली. खंडपीठाने पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नूपूर शर्मा यांनी नॅशनल टीव्हीवर आक्षेपार्ह वक्तव्य करुनही त्यांना आतापर्यंत अटक का करण्यात आली नाही, असा सवालही केला. कोर्टाने असंही म्हटलं की नुपूर शर्मांनी नॅशनल टीव्हीवर येऊन देशाची माफी मागायला हवी होती. टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा; नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं एनव्ही शर्मा या नावाने नुपूर शर्मांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबतही या दुहेरी खंडपीठाच्या वतीने सवाल उपस्थित करण्यात आला. याला उत्तर देताना नुपूर शर्मांचे वकील मनिंदर सिंग यांनी न्यायालयाला सांगितलं की, प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या टीकेनंतर नुपूर शर्माला अनेक धमक्यांना सामोरे जावं लागत होतं, त्यामुळे त्यांनी एनवी शर्माच्या नावाने याचिका दाखल केली होती. वकिलाच्या या युक्तिवादावर सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मांबद्दल आणखी एक टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटलं, "त्यांना काही धोका आहे की त्या स्वत: सुरक्षेला धोका निर्माण झाल्या आहेत?". यानंतर नुपूर शर्मा आणि त्यांच्या वर्तनाबद्दल न्यायालयाने त्यांना कठोर शब्दांत खडसावलं. खंडपीठाने उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये, नुपूर शर्माने दिशाभूल करणाऱ्या नावाखाली याचिका का दाखल केली हा पहिला प्रश्न होता. नुपूर शर्माच्या वतीने त्यांच्यावर दाखल असलेल्या खटल्यांची सुनावणी दिल्लीत करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. एनव्ही शर्मा नावाने ही याचिका दाखल करण्यात आली होती. एनव्ही शर्मा याचा अर्थ नुपूर विनय शर्मा असावा असं सांगितलं जात आहे. विनय शर्मा हे नूपुरच्या वडिलांचे नाव आहे. सध्या, नुपूर शर्मांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे आणि त्यांना त्या राज्यांच्या उच्च न्यायालयांशी संपर्क साधण्यास सांगितलं आहे, जिथे त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा नवा मार्गदर्शक सूचना जाहीर, अशी आहे कडक नियमावली नुपूर शर्मा यांनी भाजप प्रवक्त्या म्हणून एका टीव्ही चर्चेत भाग घेतला होता, जिथे त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. नुपूर यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून आणि जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि भाजपनं त्यांना निलंबित केलं. दुसरीकडे, नुपूर शर्माविरुद्ध वेगवेगळ्या राज्यांमध्ये एफआयआरही नोंदवण्यात आले होते, मात्र त्यांना अटक करण्यात आली नव्हती. नुपूर यांच्या अटकेच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली, अनेक ठिकाणी हिंसाचारही पाहायला मिळाला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Supreme court

    पुढील बातम्या