नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत संमत होत असताना का पेटला आहे ईशान्य भारत?

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत संमत होत असताना का पेटला आहे ईशान्य भारत?

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात (CAB) ईशान्य भारतात हिंसक आंदोलनं सुरू आहेत. आसामच्या 10 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून संध्याकाळपासून फोन आणि इंटरनेट सेवासुद्धा बंद आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली/ दिसपूर (आसाम), 11 डिसेंबर : एकीकडे राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना आसाममध्ये या विधेयकावर तीव्र निदर्शनं होत होती. राज्यभरात 10 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संध्याकाळपासून फोन आणि इंटरनेट सेवासुद्धा बंद आहेत. बुधवारी राजधानी दिसपूरच्या जनता भवनजवळ बस जाळण्यात आली. सचिवालयाजवळ पोलीस आणि विद्यार्थी निदर्शकांमध्ये झटापट झाली. स्वतः मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना या संचारबंदी आणि हिंसाचाराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री सोनोवाल यांना रस्त्यावरची अशांतता लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळावरच रोखून धरण्यात आलं, अशी बातमी आहे. काही तास ते गुवाहाटी विमानतळावरच अडकून पडले.

का पेटलाय ईशान्य भारत?

ईशान्य भारतातला काही प्रदेशांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या शेड्युलमध्ये केला आहे. हे प्रदेश CAB च्या कक्षेबाहेर आहेत. आसाममध्ये आधीच NRC अंतर्गत नागरिकत्व नोंदणी मोहीम राबवण्यात आली आणि आवश्यक कागदपत्रं दाखवून नागरिकत्व सिद्ध न करू शकलेल्या व्यक्ती बेकायदेशीर नागरिक ठरल्या. त्यांना घुसखोर ठरवण्यात येईल. याउलट आता बांगलादेशातून आणि इतर सीमेजवळच्या देशांतून आलेल्या बिगरमुस्लीम निर्वासितांना त्या त्या राज्यात अधिकृत नागरिकत्व घेता येईल. त्यातून या प्रदेशाची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थिती धोक्यात येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

CAB साठी 31 डिसेंबर 2014 ही अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. CAB हे फक्त स्थलांतरितांसाठी आहे. काही कारणांमुळे ज्यांना NRC सारख्या यादीतून वगळण्यात आलं आहे अशा इथे मूळचे राहणाऱ्या व्यक्तींसाठी ते लागू नाही.

-----------------------------------------------

अन्य संबंधित बातम्या

CAB 2019 : राज्यसभेत मतदानाच्या वेळी सेना का बाहेर पडली? संजय राऊतांचा खुलासा

मोदी सरकारचा मोठा विजय, राज्यसभेत 'नागरिकत्व' विधेयक मंजूर

नागरिकत्व सुधारणा विधेयकाने नेमकं काय बदलेल? मनातल्या 12 प्रश्नांची उत्तरं

CABला विरोध, महाराष्ट्रात IPS अधिकारी अब्दुर रहेमान यांचा राजीनामा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 10:16 PM IST

ताज्या बातम्या