मग नरेंद्र मोदींना 50 करोड़ की गर्लफ्रेंड असं म्हणणं शोभतं का? काँग्रेसचा सवाल

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार जयाप्रदा आणि सपा नेते आझम खान यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 11:32 PM IST

मग नरेंद्र मोदींना 50  करोड़ की गर्लफ्रेंड असं म्हणणं शोभतं का? काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली 15 एप्रिल : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेलं वादळ शांत होण्याची चिन्हे नाहीत. त्यावरून सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. 'CNBC आवाज'च्या टक्कर कार्यक्रमात हेच रणकंदन बघायला मिळालं. सर्वच राजकीय पक्षांनी इतिहासातली उदाहरणं देत एकमेकांवर आरोप केले.

आझम खान यांना आज भाजप टार्गेट करत असलं तरी त्यांच्या पक्षाचे नेते कुठे धुतल्या तांदुळासारखे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी शशी थरूर यांच्याबाबत बोलताना 50  करोड़ की गर्लफ्रेंड असा शब्दप्रयोग केला होता हे त्यांना शोभतं का अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केली. त्याच वेळी त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होतं असं ते म्हणाले.राज्यसभेच्या खासदार सोनल मानसिंग यांनीही महिलांबाबत होत असलेल्या वक्तव्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महिलांबाबत असं बोललं जात असेल तर अशा देशात आपण राहतो याची लाज वाटते असंही त्या म्हणाल्या.

Loading...

काय म्हणाले आझम खान?

उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील जागेवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार जयाप्रदा आणि सपा नेते आझम खान यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. रामपूरमधील शाहबाद जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना आझम खान यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमोरच जयाप्रदांवर टीका करताना आक्षेपार्ह विधान केलं.आझम खान म्हणाले की,'राजकारण इतक्या खालच्या स्तरावर पोहोचलं आहे का? ज्यांनी 10 वर्ष रामपूरवासीयांचं रक्त शोषलं, ज्यांना बोट पकडून आम्ही रामपूरमध्ये आणलं. त्यांनी आमच्यावर नको-नको ते आरोप केले. त्यांचा खरा चेहरा ओळखण्यासाठी तुम्हाला 17 वर्ष लागली, मी 17 दिवसांमध्येच ओळखलं होतं  की यांची अंडरवेअर खाकी रंगाची आहे. तुम्ही त्यांना मतदान करणार का?. दरम्यान, हे विधान करताना आझम खान यांनी जयाप्रदा यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता.ते पुढे असंही म्हणाले की, मी माझ्या हयात नसलेल्या आईची शपथ घेऊन सांगितलं की माझ्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप खोटे आहेत. या विधानावरून चौफेर टीका सुरू झाल्यानंतर आझम खान यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, जर मी दोषी आढळलो तर लोकसभा निवडणूक लढवणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2019 11:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...