अजित डोवल यांच्यावर मोदींचा का आहे एवढा भरवसा?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित डोवल यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. त्यासोबतच त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदींचा अजित डोवल यांच्यावर एवढा भरवसा का,असा प्रश्न विचारला जातो.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 05:41 PM IST

अजित डोवल यांच्यावर मोदींचा का आहे एवढा भरवसा?

नवी दिल्ली, 3 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित डोवल यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. त्यासोबतच त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदींचा अजित डोवल यांच्यावर एवढा भरवसा का,असा प्रश्न विचारला जातो.

अजित डोवल यांच्या नेतृत्वाखाली जम्मू - काश्मीरमध्ये लष्कराने एकापाठोपाठ एक अतिरेक्यांचा खात्मा केला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच माओवाद्यांचा नि:पात करण्यासाठी देशाच्या बाहेर जाऊन सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. अजित डोवल यांच्याच नेतृत्वाखाली भारताने दहशतवादी हल्ल्यांना जशास तसं उत्तर दिलं.

भाजपच्या यशात योगदान

लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामध्ये अजित डोवल यांचं मोठं योगदान आहे, असं ज्येष्ठ पत्रकार अंबिका सहाय यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते, पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राइक केला त्यामुळे हे सरकार पाकिस्तानला उत्तर द्यायला सक्षम आहे, असा संदेश संपूर्ण जनतेत गेला.

याआधी उरीच्या हल्ल्यानंतरही भारताने सर्जिकल स्ट्राइक करून तोडीस तोड उत्तर दिलं. यावेळी झालेल्या निवडणुकांमध्ये देशातली अंतर्गत सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनला होता. या स्थितीत अजित डोवल यांच्या नेतृत्वाखाली झालेले सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक याचा फायदा सरकारला मिळाला.

Loading...

कोण आहेत अजित डोवल ?

1968 च्या केरळ कॅडरचे निवृत्त आयपीएस अधिकारी अजित डोवल इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक होते. 1988 मध्ये अजित डोवल यांना कीर्तीचक्रानेही सन्मानित करण्यात आलं होतं. ही कहाणी 1988 ची आहे जेव्हा ऑपरेशन ब्लॅक ठंडर ही मोहीम आखण्यात आली. ही मोहीम खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात होती.

या कारवाईच्या काही दिवस आधी अमृतसरमध्ये एक नवा रिक्षावाला आला. खलिस्तानी अतिरेक्यांना त्याचा संशय आला. त्यावेळी या रिक्षावाल्याने त्यांना आपण आयएसआयचा एजंट असल्याचं सांगितलं. हा रिक्षावाला नेमका कोण होता हे एक कोडंच आहे. पण खलिस्तानी अतिरेक्यांना भेटून अजित डोवल यांनी त्यांच्याबद्दलची खडान् खडा माहिती मिळवली. याच माहितीच्या आधारे ब्लॅक कॅट कमांडोंनी 41 अतिरेक्यांना ठार मारलं. त्याचवेळी 200 अतिरेकी शरण आले.

दाऊदपर्यंत पोहोचण्याची योजना

इंटेलिजन्स ब्युरोने 2005 मध्ये छोटा राजनचा शूटर विकी मल्होत्रा याच्यामार्फत दाऊद इब्राहीमला मारण्याची योजना बनवली होती. या योजेनेची जबाबदारी नुकतेच निवृत्त झालेल्या अजित डोवल यांच्यावरच होती पण अजित डोवल आणि विकी मल्होत्रा जेव्हा दिल्लीत यासाठी भेटले तेव्हाच मुंबई क्राइम ब्रँचने विकी मल्होत्राला अटक केली आणि दाऊदला मारण्याची योजना बारगळली.

2014 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

अजित डोवल यांच्या कार्यक्षमतेमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक केली. आणि आता पुन्हा एकदा त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

============================================================================================

VIDEO : गोपीनाथ मुंडेंचं नाव लावण्यावरून मुख्यमंत्री कुणाला म्हणाले करंटे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...