'अच्छा तो हम चलते है'...असं का म्हणाल्या मनेका गांधी?

'अच्छा तो हम चलते है'...असं का म्हणाल्या मनेका गांधी?

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात मनेका गांधी यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. तुम्हाला मंत्रिपद का मिळालं नाही, असा प्रश्न जेव्हा मनेका गांधींना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर देणं टाळलं. सुलतानपूरची जनताच तुम्हाला हे उत्तर देऊ शकेल, असं मनेका गांधी म्हणाल्या.

  • Share this:

सुलतानपूर, 3 जून : मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात मनेका गांधी यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. मागच्या मोदी सरकारमध्ये मनेका गांधी यांच्याकडे महिला आणि बालकल्याण खातं होतं. तुम्हाला मंत्रिपद का मिळालं नाही, असा प्रश्न जेव्हा मनेका गांधींना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर देणं टाळलं. सुलतानपूरची जनताच तुम्हाला हे उत्तर देऊ शकेल, असं मनेका गांधी म्हणाल्या.

मतदारसंघांची अदलाबदल

मनेका गांधी आणि वरुण गांधी यांच्या मतदारसंघात यावेळी अदलाबदल करण्यात आली होती. मनेका गांधींनी सुलतानपूरमधून निवडणूक लढवली तर वरुण गांधी हे त्यांच्या पिलीभीत मतदारसंघातून लढले.

निवडणुकीनंतर मनेका गांधींनी त्यांच्या सुलतानपूर मतदारसंघाला भेट दिली आणि मतदारांचे आभार मानले. प्रत्येक वर्गातल्या लोकांचा विकास करण्याचं आश्वासनही मनेका गांधींनी दिलं.

प्रोटेम स्पीकरची शक्यता

जे खासदार बराच काळ संसदेमध्ये प्रतिनिधित्व करतात त्यांना प्रोटेम स्पीकर बनवलं जातं. आपण अशा सदस्यांपैकी एक आहोत, असं मनेका गांधींनी म्हटलं आहे. सर्वात जास्त काळ संसदेत राहिल्यामुळे आपल्याला प्रोटेम स्पीकर बनवलं जाऊ शकेल, असंही त्या म्हणाल्या.

वरुण गांधींबद्दल...

जेव्हा लोकसभा नव्याने भरते तेव्हा संसदेत जास्त काळ राहण्याचा अनुभव असलेल्या नेत्याला प्रोटेम स्पीकर बनवलं जातं. प्रोटेम स्पीकर पदी असलेली व्यक्ती नव्या खासदारांना सदस्यत्वाची शपथ देते. लोकसभेच्या सदस्यांनी शपथ घेतल्यानंतर हे सदस्य लोकसभा अध्यक्षांची निवड करतात.

मनेका गांधींना वरुण गांधींबद्दलही विचारण्यात आलं. वरुण गांधींना मंत्रिपद का दिलं नाही, असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या.... अच्छा तो हम चलते है!

===========================================================================

रिंकू राजगुरूने सांगितला तिला आलेल्या प्रपोजलचा 'तो' भन्नाट किस्सा

First published: June 3, 2019, 6:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading