'फानी'वरुन राजकीय चक्रीवादळ; PM मोदींचा फोन घेण्यास CM ममतांचा नकार!

'फानी'वरुन राजकीय चक्रीवादळ; PM मोदींचा फोन घेण्यास CM ममतांचा नकार!

'फानी' चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरून दुर गेले असले तरी आता त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 मे: 'फानी' चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरून दुर गेले असले तरी आता त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला लोकसभा निवडणूक सुरु आहे आणि दुसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्तीवरून राजकीय वादळ सुरु झाले आहे. शनिवारी तृणमूल काँग्रेसने फानीवरून पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

काय झालं नेमकं

'फानी' चक्रीवादळासंदर्भात माहिती घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून ओडिशा आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना फोन करण्यात आले होते. या फोनमागे 'फानी' संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याचा उद्देश होता. पण तृणमूलने असा दावा केली की PMOकडून केवळ राज्यपालांनाच फोन केला गेला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केला गेला नाही. तृणमूलच्या मते PM मोदींनी या गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.

तृणमूलने असा दावा केला आहे की मोदींनी ममतांना फोन करून फानी चक्रावादळासंदर्भात माहितीच घेतली नाही. मात्र पंतप्रधान कार्यालयाने तृणमूलचा हा दावा फेटाळून लावला आहे. PMOच्या मते ममता बॅनर्जींशी बोलण्यासाठी दोन वेळा फोन केला गेला पण त्या फोनवर आल्या नाहीत.

PMOचा दावा

पीएमओमधील अधिकाऱ्यांनी दोन वेळा मोदींची मुख्यमंत्री ममता यांच्याशी बोलण्याचा फोन केला. पण दोन्हीवेळा त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर पीएमओमधील सूत्रांनी ही माहिती दिली. पहिल्यांदा फोन केल्यानंतर मुख्यमंत्री दौऱ्यावर असल्याचे सांगितले गेले आणि PMOला फोन केला जाईल असे सांगण्यात आले. दुसऱ्यांदा फोन केल्यावर देखील हेच उत्तर देण्यात आले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार मुख्यमंत्री ममता यांच्याशी चर्चा न झाल्याने अखेर मोदींनी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याशी फोनवर चर्चा केली.

SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'

First published: May 5, 2019, 3:54 PM IST
Tags: BJP

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading