मराठी बातम्या /बातम्या /देश /

Coronavirus: आता कोणत्याही आजारावरील वॅक्सीन बनवण्यासाठी कमी वेळ लागेल?

Coronavirus: आता कोणत्याही आजारावरील वॅक्सीन बनवण्यासाठी कमी वेळ लागेल?

पोलियोवरील लस तयार करण्यास संशोधकांनी 1935 मध्ये सुरूवात केली परंतु 1953 मध्ये वॅक्सीन आलं. कोविड-19 वॅक्सीन वर्षभरात तयार होण्यामागे का कारण आहे?

पोलियोवरील लस तयार करण्यास संशोधकांनी 1935 मध्ये सुरूवात केली परंतु 1953 मध्ये वॅक्सीन आलं. कोविड-19 वॅक्सीन वर्षभरात तयार होण्यामागे का कारण आहे?

पोलियोवरील लस तयार करण्यास संशोधकांनी 1935 मध्ये सुरूवात केली परंतु 1953 मध्ये वॅक्सीन आलं. कोविड-19 वॅक्सीन वर्षभरात तयार होण्यामागे का कारण आहे?

  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 8 डिसेंबर : कोरोना व्हायरसवरील वॅक्सीन (coronavirus vaccine) वर्षभरात तयार झाली असून अन्न आणि औषध प्रशासनाकडे (FDA) मंजुरीसाठी गेलं आहे. यापूर्वी 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू (Spanish flu) आल्यानंतर त्यावरील लस तयार करण्यासाठी तब्बल 27 वर्ष लागली होती. पोलियोवरील लस तयार करण्यास संशोधकांनी 1935 मध्ये सुरूवात केली परंतु 1953 मध्ये लस आली. कोविड-19 वॅक्सीन वर्षभरात तयार होण्यामागे का कारण आहे? याआधी सर्वच लशींसाठी सुरुवातीपासून काम करावं लागलं. पोलियो आणि स्पॅनिश फ्लू दोघांमध्ये या आजाराचं कारण काय आहे हे आधी समजून घ्यावं लागलं. अनेक काळानंतर, यासाठी जबाबदार असलेल्या व्हायरसची माहिती मिळाली. त्यानंतर कमकुवत किंवा मृत व्हायरस मानवी शरीरात अँटीबॉडी बनवण्यासाठी तयारी झाली. यासाठीही अनेक समस्या आल्या. 2.5 मिलियन मुलं पोलियोची लस घेतात, त्यापैकी एक मुल लशीकरणानंतरही पोलियो संक्रमित होतो. दुसरीकडे नवी लस आहे, याची प्रक्रिया सोपी आहे. लॅबमध्ये एक व्हायरस, जो अतिशय कमकुवत असतो, तो तयार होतो. किंवा व्हायरसच्या आरएनएबाबत लॅबमध्ये त्यावर खास प्रक्रिया होते. तो शरीरात सोडल्यानंतर आजारी पडण्याची भीती कमी होते. मॉड्यूलर वॅक्सीनची संकल्पना अधिक जुनी नाही परंतु ती प्रभावी आहे. ऑक्सफोर्ड वॅक्सीन याच मॉड्यूलर वॅक्सीनचं उदाहरण आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, याच धर्तीवर लॅबमध्ये कोणतंही नुकसान न करणारा व्हायरस तयार केला गेला आणि त्यानंतर चिकनगुनिया, जीका, मर्स, एवढंच नाही तर, प्रोस्टेट कॅन्सरची लसही तयार झाली. 2019 च्या डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमध्ये पहिल्यांदा कोरोना व्हायरसबाबत माहिती मिळाली. 10 जानेवारी रोजी चीनच्या संशोधकांनी व्हायरसच्या जेनेटिक संरचनेचा शोध लावला. त्यानंतर जगभरातील संशोधक कोडच्या आधारे वॅक्सीन तयार करण्यासाठी प्रयत्न करू लागले. ऑक्सफोर्ड वॅक्सीन केवळ 3 महिन्यातच तयार झाली होती आणि 23 एप्रिलपासून याच्या ह्यूमन ट्रायलला सुरुवात झाली. लस तयार होण्यापेक्षा प्रशासकीय प्रक्रिया आणि पेपरवर्कमध्ये अधिक काळ लागला. तयारीसाठी मंजुरी घेणं, फंड गोळा करणं आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी कंपन्यांसाठी बोलणाऱ्यांचा हिस्सा मोठा आहे, जो दिसून येत नाही. स्पॅनिश फ्लूवेळीही लस तयार करण्यासाठी वेळ लागला, परंतु त्यावेळी काही खास माहिती नव्हती, तसंच संशोधकांना लशीच्या निर्माणावेळी सतत रिजेक्शन येत होतं. आता वॅक्सीन तयार करताना कमी वेळ लागतोय, परंतु यात अनेक समस्याही येऊ शकतात. ह्यूमन ट्रायलसाठी जवळपास दोन महिने लागले. सध्या ऑक्सफोर्डसह फायजर आणि मॉडर्ना या दोन वॅक्सीनला मंजुरी मिळाली आहे.
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या