Chandrayaan2 चं आजचं प्रक्षेपण रद्द, शास्त्रज्ञांनी शेवटच्या क्षणी घेतला निर्णय

Chandrayaan2 चं आजचं प्रक्षेपण रद्द, शास्त्रज्ञांनी शेवटच्या क्षणी घेतला निर्णय

रॉकेटमध्ये भरलेलं सर्व इंधन खाली करण्यात येणार आहे. त्यानंतर रॉकेट पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येईल. त्याची सखोल तपासणी केल्यानंतरच नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

श्रीहरीकोटा 15 जुलै : सर्व देशाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-2 मोहिमेचं आजचं प्रक्षेपण रद्द करण्यात आलंय. प्रक्षेपणाला  56 मिनिटं आणि 24 सेकंद राहिले असताना काउंटडाऊन रोखण्यात आलं. काही तांत्रिक कारणांमुळे इस्रोने हा निर्णय घेतला. पहाटे 2 वाजून 51 मिनिटांची चांद्रयानाचं उड्डाण होणार होतं. मात्र क्रायोजिनिक इंजिनमध्ये इंधन भरताना काही तांत्रिक दोष आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने प्रक्षेपण रोखण्यात आल्याचं इस्रोने म्हटलं आहे. GSLV Mk-3 या बाहुबली प्रक्षेपकाच्या साह्याने 'चांद्रयान 2'  आकाशात झेपावणार होतं.  त्यासाठी इस्रोची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र क्रायोजिनिक इंजनच्या यंत्रणेत काही दोष आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला.

रॉकेटमध्ये जेवढं इंधन भरण्यात आलं होतं ते खाली केल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता इस्रोने व्यक्त केलीय. रॉकेटमध्ये भरलेलं सर्व इंधन खाली करण्यात येणार आहे. त्यानंतर रॉकेट पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येईल. त्याची सखोल तपासणी केल्यानंतरच नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान आकाशात झेपावणार होतं.

Chandrayaan- 2 असं उभं राहिलं 'चांद्रयान-2', ISROचा Exclusive Video

इस्रोची झेप

मार्च महिन्यात भारताने अंतराळातील लाईव्ह उपग्रह पाडला होता. मिशन शक्तीच्या या यशानंतर भारत जगभरातील मोजक्या देशांच्या पंक्तीत विराजमान झाला होता. अंतराळात कार्यरत असलेला उपग्रह पाडण्याची क्षमता केवळ अमेरिका, रशिया आणि चीन यांच्याकडेच होती. चांद्रयान-2 च्या यशानंतर अशी मोहिम राबविणारा भारत हा जगातला चौथा देश ठरला असता.

अशा अंतराळ मोहिमांमध्ये अशी शक्यता गृहित धरली जाते. कारण कुठेही थोडीजरी शंका आली तरी मोहीम थांबविण्यात येते. कारण त्यासाठी प्रचंड पैसा आणि मनुष्यबळ खर्च करण्यात येत असतं. त्याचबरोबर देशाची प्रतिष्ठाही पणाला लागत असते.

अभिमानास्पद! CHANDRAYAAN-2 चं हे आहे 'महाराष्ट्र' कनेक्शन

चांद्रयान-2ची वैशिष्ट्ये

1) चांद्रयान-2चे वजन 3.8 टन इतके आहे. आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे हे वजन

2) यात 13 भारतीय पेलोड असतील त्यातील 8 ऑर्बिटर, 3 लँडर आणि 2 रोव्हर असतील. याशिवाय NASAचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.

3) चांद्रयान-2 चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहिम झालेली नाही.

4) भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान-2 एक उदाहरण ठरणार आहे.

5) या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर पोहोचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणत्याही देशाने केलेला नाही.

6) चांद्रयान-2 एकूण 12 भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.

First published: July 15, 2019, 3:46 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading